मुंबई: मुलगा दुधासाठी रडत होता, वडिलांनी दिलं फेकून अन्.. स्वत: दारूच्या नशेत
Mumbai crime : मुंबई शहरातील पवई परिसरातून मन थक्क करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दूधाची मागणी केल्याने मद्यधुंद अवस्थेतील वडिलांनी आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. घडलेल्या घटनेनुसार, तो मुलगा प्रामुख्याने दूधाची मागणी करत होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चार वर्षांच्या लेकाची वडिलांकडून हत्या
शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक
Mumbai Crime : मुंबई शहरातील पवई परिसरातून मन थक्क करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दूधाची मागणी केल्याने मद्यधुंद अवस्थेतील वडिलांनी आपल्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. घडलेल्या घटनेनुसार, तो मुलगा प्रामुख्याने दूधाची मागणी करत होता. आरोपीची पत्नी त्याच्या दारूच्या व्यसनाला वैतागून माहेरी गेली होती. तर मुलगा हा वडिलांसोबतच राहत होता. दरम्यान, मुलाने वडिलांजवळ दुधाची मागणी केली होती. याच घटनेदरम्यान वडिलांनी त्याला दरवाजावर आदळले, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली.
हे ही वाचा : Astrology : गुरूचा कर्क राशीत प्रवेश, हंस महापुरुष राजयोगाची निर्मिती; 'या' राशींचे भाग्य बदलेल
चार वर्षांच्या लेकाची वडिलांकडून हत्या
मुंबईच्या पवई परिसरात चार वर्षांच्या लेकाची त्याच्याच वडिलांनी हत्या केली. दुधासाठी रडणाऱ्या संतप्त झालेल्या वडिलांनी त्याला निर्घृणपणे मारहाण करतं संपवल्याचा आरोप आहे. मुलाला दरवाजावर आपटले, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पवई पोलिसांनी या प्रकरणात आरोपी वडील राजेश सिंग (वय 26) दरम्यान आरोपी हा दारूच्या अगदीच आहारी गेल्याचे सांगितलं जातंय, तर पत्नी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरकाम देखील करत होती.
शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दांपत्याला एकुलता एक मुलगा, यशला दूध प्यायची अधिक सवय होती. संबंधित घटनेदरम्यान वडील राजेश आणि मुलगा यश घटनास्थळी उपस्थित होते. ही घटना गुरुवारी पहाटे 5 वाजता पवईच्या गौतमनगर परिसरात घडली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मुलाच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती.
हे ही वाचा : प्रपोजल नाकारल्याने चिडला, सरकारी क्लार्कने लेडीज टॉयलेटमध्ये लावला कॅमेरा; अन्...
अशातच पवई पोलिसांनी आरोपी राजेश सिंग याला अटक तेली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. या घटनेनंतर राजेश हा आपल्या बहिणीच्या घरी गेला आणि त्याने मुलाला बेदम मारहाण केल्याची माहिती सांगितली. त्याची बहीण ही तात्काळपणे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.









