प्रपोजल नाकारल्याने चिडला, सरकारी क्लार्कने लेडीज टॉयलेटमध्ये लावला कॅमेरा; अन्...
Crime News : डीआरडीए कार्यालयातील महिला स्वच्छतागृहात स्पाई कॅमेरा बसवून महिलांच्या खासगी व्हिडिओंची रेकॉर्डिंग करणाऱ्या लिपिकाला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रपोजल नाकारल्याने चिडला,
सरकारी क्लार्कने लेडीज टॉयलेटमध्ये लावला कॅमेरा; अन्...
Crime News : जिल्हा ग्रामीण विकास अभिकरण (DRDA) कार्यालयातून महिलांच्या सुरक्षेशी अत्यंत किळसवाणा खेळ करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ज्युनिअर लिपिकाने महिला स्वच्छतागृहात गुप्त (स्पाई) कॅमेरा बसवून महिलांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा : 'हॅलो, मी बोलतेय, बागेत या..' तो आला आणि फसला! काय घडलं?
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. या प्रकरणाचा भंडाफोड जगतसिंहपूरचे पोलीस अधीक्षक अंकित वर्मा यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला असून, आरोपीचे नाव संजय अडेखा असे असल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा : एक दिवसापूर्वी भाजपात आले, अन् थेट विधानपरिषेदची उमेदवारी









