एक दिवसापूर्वी भाजपात आले, अन् थेट विधानपरिषेदची उमेदवारी
Maharashtra Politics : भाजपने विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी 11 जणांची उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये प्राजक्त तनपुरे यांचाही समावेश आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एक दिवसापूर्वी भाजपात आले
अन् थेट विधानपरिषेदची उमेदवारी
Prajakt Tanpure : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवड समितीने विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 11 नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या प्राजक्त तनपुरे यांना आहिल्यानगरमधून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. 11 जणांच्या यादीत कोणा-कोणाला संधी देण्यात आलीये? प्राजक्त तनपुरे नेमके कोण आहेत? सविस्तर जाणून घेऊयात...
हेही वाचा : 'माझा नवरा तृतीयपंथी..' नवविवाहितेच्या सुखी संसाराच्या स्वप्नाचा शेवट; नेमकं काय घडलं?
भाजपच्या 11 उमेदवारांची संपूर्ण यादी (मतदारसंघानुसार)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर
अमरावती : प्रवीण पोटे पाटील
सांगली-सातारा : धैर्यशील कदम
सोलापूर : राजेंद्र राऊत
अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे
छ. संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट
नांदेड : अमर राजूरकर
धाराशिव-बीड-लातूर : बसवराज पाटील
जळगाव : नंदकिशोर महाजन
नागपूर : डॉ. राजीव पोतदार
हेही वाचा : Maharashtra Weather : जून महिन्यात मान्सूनचं टेन्शन वाढलं, 29 जिल्ह्यांवर मोठं संकट









