Maharashtra Weather : जून महिन्यात मान्सूनचं टेन्शन वाढलं, 29 जिल्ह्यांवर मोठं संकट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता वाढताना दिसत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत काही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस थैमान घालणार आहे. राज्यातील 23 जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता

point

एकूण 29 जिल्ह्यांना इशारा

Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व पावसाची सक्रियता वाढताना दिसत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत काही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस थैमान घालणार आहे. राज्यातील 23 जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 6 जिल्ह्यांना धोक्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तसेच उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे ही वाचा : अहिल्यानगरात बसची एर्टीगाला धडक, अपघातात कारचा भुगा; 15 जण...

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किनारपट्टी भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नंदूरबार या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला. धुळे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला. या भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगलवी आणि सोलापूर या जिल्ह्यांत कोणताही अलर्ट जारी केला नाही. 

हे वाचलं का?