जालना जिल्ह्यात भीषण अपघात, कार जळून खाक; गाडीतच अडकला चालक अन्..
Jalna accident : जालना जिल्ह्यातील जाफराबाद-चिखली मार्गावर सकाळी भीषण अपघात झाला. एका वेगवान येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून कार एका झाडावर आदळली, नंतर त्याच कारने भीषण पेट घेतला. या भीषण अपघातात कार चालक नितिन प्रभाकर गवळी असल्याचे सांगण्यात येते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गाडी रस्त्याच्या कडेला झाडावर जोरात आदळली
कार जळून खाक अन् ड्रायव्हरचाही मृत्यू
Jalna Accident : गौरव साळी - जालना जिल्ह्यातील जाफराबाद-चिखली मार्गावर सकाळी भीषण अपघात झाला. एका वेगवान येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून कार एका झाडावर आदळली, नंतर त्याच कारने भीषण पेट घेतला. या भीषण अपघातात कार चालक नितिन प्रभाकर गवळी (वय 35) याचा कारमध्ये जळून मृत्यू झाला. या भीषण अपघातात कार पूर्णपणे जळून खाक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : Astrology : आजच्या दिवशी 'या' राशीतील लोकांच्या प्रेमसंबंधात रोमँटिक सरप्राईज
गाडी रस्त्याच्या कडेला झाडावर जोरात आदळली
माहितीनुसार, नितिन गवळी आपल्या कारने जाफराबाद-चिखली मार्गावर प्रवास करत होता. आज पहाटे, त्याची गाडी अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जोरात जाऊन आदळली. धडक इतकी जोरात होती की, गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले. दुर्घटनेनंतर काही क्षणांतच वाहनाचा भीषण आग लागली. आगीचा भडका वाढल्याने कारने पेट घेतला.
कार जळून खाक अन् ड्रायव्हरचाही मृत्यू
माहितीनुसार, आगीतून चालकाला गाडीतून बाहेर पडता न आल्याने काही मिनिटांतच कार जळून पूर्णपणे खाक झाली. नंतर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी दुर्घटनाग्रस्त वाहनाचे देखील निरीक्षण केले.
हे ही वाचा : 16 वर्षीय शाळकरी मुलीचं अपहरण, चॉकलेट खाल्ल्यानंतर बेशुद्ध; 5 जणांनी मिळून...
प्राथमिक तपासातून उघडकीस आले की, भारधाव वेगात वाहन चालवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला. अशातच या दुर्घटनेमागील इतर वास्तविक प्रकरण नेमकं काय होतं, याचा तपास सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या घटनेनं घटनास्थळ हादरून गेला आहे.









