16 वर्षीय शाळकरी मुलीचं अपहरण, चॉकलेट खाल्ल्यानंतर बेशुद्ध; 5 जणांनी मिळून...

मुंबई तक

Crime News : एका 16 वर्षीय शाळकरी मुलीचं अपहरण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी दोन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत, नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

चॉकलेट दिलं, नंतर पलंगावर आळीपाळीने नको तेच...

point

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Crime News : कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात एका 16 वर्षीय शाळकरी मुलीचं अपहरण करत तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी शनिवारी दोन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीडित विद्यार्थिनीने पुढे येऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, हा प्रकार उघडकीस आला. पीडितेनं सांगितलं की, शुक्रवारी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. नंतर तिने सांगितलं की, शुक्रवारी सकाळी सुमारे 8.15 वाजता ती बंटवाल शहरातील बस स्टॉप परिसरातून शाळेत जात असताना आरोपी गाडीतून आले.  

हे ही वाचा : प्रेयसीच्या नादी लागला, सोन्यासारख्या पत्नीला पावडर खाऊ घातली; भयंकर प्रकरण!

चॉकलेट दिलं, नंतर पलंगावर आळीपाळीने नको तेच...

पीडितेनं सांगितलं की, आरोपींपैकी एक जण गाडीतून उतरला आणि तिचा मित्र असल्याची माहिती दिली. संबंधित तरुणाला आपण ओळखत नसल्याची माहिती दिली, तेव्हा त्याने आपण सोशल मीडियाद्वारे एकमेकांना ओळखतो असं सांगितलं. अशातच बोलता बोलता तिला एक चॉकलेट दिले आणि ते तिच्या बॅगेत ठेवेपर्यंत ती बेशु्द्ध झाली. जेव्हा तिला शुद्ध आली असता, ती एका पलंगावर होती आणि आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. 

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांनी या बाबतीत सांगितलं की, आरोपीने तिला बंटवाल शहराजवळ सोडून दिले आणि पीडितेच्या आईला फोन केला असता, ती घरी परतली. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली, अशातच तिघांचा शोध घेणं सुरू आहे. पीडितेवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणी महिला आयोगाकडून दक्षिण कन्नड अधीक्षकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली होती.

हे ही वाचा : नागपूर : मॅट्रिमोनी ॲप, शारीरिक शोषण अन् 15 लाख; 31 वर्षीय महिला कशी अडकली?

महिला आयोगाने जिल्हा स्तरावर पीडित मुलीला मदत करण्याचे याआधी निर्देश दिले. दरम्यान मुलीवर एका वन स्टॉप सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जिथे वैद्यकीय, कायदेशीर आणि पोलीस मदत झाली. 

हे वाचलं का?