नागपूर : मॅट्रिमोनी ॲप, शारीरिक शोषण अन् 15 लाख; 31 वर्षीय महिला कशी अडकली?
मॅट्रिमोनी ॲपच्या माध्यमातून एका 31 वर्षीय महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपीने तिचे शारीरिक शोषण आणि 15 लाख रुपये लाटल्याचं पीडितेनं सांगितलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नागपूर : मॅट्रिमोनी ॲप, शारीरिक शोषण अन् 15 लाख
31 वर्षीय महिला कशी अडकली?
Nagpur Crime : मॅट्रिमोनी ॲपच्या माध्यमातून एका 31 वर्षीय महिलेशी ओळख वाढवून तिची तब्बल 14 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह बलात्कार आणि छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मुख्य आरोपी राघवेंद्र किशोर अवस्थी याला अटक केली आहे. मॅट्रिमोनी ॲपवर स्वतःची खोटी माहिती देऊन आरोपीने या महिलेला आपल्या जाळ्यात ओढल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
जिम सुरु करण्याच्या बहाण्याने
आरोपी राघवेंद्र अवस्थी याने मॅट्रिमोनी ॲपवर स्वतःला घटस्फोटीत असल्याचे सांगितले होते. एवढेच नव्हे तर त्याची पहिली पत्नी जिवंत असतानाही, ती मृत झाल्याची खोटी माहिती देऊन त्याने पीडित महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी पीडितेकडून वेळोवेळी तब्बल 14 लाख 80 हजार रुपये उकळले. नवीन जिम सुरू करण्याच्या बहाण्याने आरोपीने ही रक्कम महिलेकडून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा : चंद्रपूर : 'आईच्या प्रियकराने माझ्यावर..' 15 वर्षीय मुलीने सगळंच सांगितलं, काय घडलं?
पैशांची मागणी आणि मारहाण
पैसे घेतल्यानंतरही आरोपीची हाव संपली नाही. जिमसाठी त्याने आणखी पैशांची मागणी करत आरोपीने पीडित महिलेला मानसिक व शारीरिकदृष्ट्या छळण्यास सुरुवात केली. या पैशांसाठी तिला वारंवार मारहाण देखील करण्यात आली. लग्न करण्याचे खोटे आश्वासन देऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोपही पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलिसांत धाव घेतली.
हे ही वाचा : 'चिमणे...परत ये गं...' रीलस्टार हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीणीची आत्महत्या, नवऱ्याची पोस्ट व्हायरल
आरोपीला ठोकल्या बेड्या
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे यशोधरा नगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि मुख्य आरोपी राघवेंद्र अवस्थी याला बेड्या ठोकल्या.









