रील स्टार रोहिणी जाताच निलेश आयुष्यात नवं वादळ, प्रकरण काय?

मुंबई तक

हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीण आणि रीलस्टार रोहिणी पाराध्ये यांच्या आत्महत्येने चांगलीच खळबळ माजली आहे. त्यांचे पती निलेश यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Reel Star Rohini Paradhye Suicide Case
Reel Star Rohini Paradhye Suicide Case
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'चिमणे...परत ये गं...'

point

रीलस्टार हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीणीची आत्महत्या,

point

नवऱ्याची पोस्ट व्हायरल

Reel Star Rohini Paradhye Suicide Case : रीलस्टार आणि हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीण रोहिणी निलेश पाराध्ये (वय 25) यांच्या आत्महत्येनंतर चांगलीच खळबळ माजली होती. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी याठिकाणी ही घटना घडली. रोहिणी आणि निलेश या जोडीने हॉटेलच्या रील्समुळे हजारो नेटिझन्सच्या मनात घर केले होते. मात्र रोहिणी यांच्या आत्महत्येमुळे सगळेच जण हादरुन गेले. त्यांनी हॉटेल ग्रामपंचायतच्या दोन शाखा सुरु केल्या होत्या. मात्र त्या सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. या शाखांच्या विस्तारातून दोघांमध्ये ताणतणाव निर्माण झाल्याने रोहिणी यांनी आत्महत्या केली असावी, अशा चर्चा सुरु आहेत. अशातच रोहिणी यांच्या नवऱ्याने म्हणजेच निलेश यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊया.

निलेश यांची पोस्ट जशीच्या तशी

माझी बायको माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं ग...या पाच वर्षांच्या सोबतीत तिने मला फक्त साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्यासाठी तिने किती हाल सोसले, किती कष्ट केले, याची गणतीच नाही. जेव्हा मी खचून जायचो, तेव्हा ती मला आधार द्यायची. जेव्हा सगळे दूर व्हायचे, तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं.

आज चांगले दिवस यायला लागले होते... आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता... पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस. आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम... सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं. चिमणे... परत ये गं... तुला खूप काही सांगायचं बाकी आहे... तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय. तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील. मिस यू ग माझ्या चिमणे...