सातारा : मातब्बर नेते डावलून भाजपची उमेदवारी मिळवली; धैर्यशील कदम आहेत तरी कोण?

मुंबई तक

Dhairyasheel Kadam profile story : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीने धैर्यशील ज्ञानदेव कदम यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड केली आहे. "हा 32 वर्षांच्या प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीचा सन्मान आहे", अशी प्रतिक्रिया धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

Dhairyasheel Kadam profile story
Dhairyasheel Kadam profile story
google news

बातम्या हायलाइट

point

सातारा-सांगली विधानपरिषदेसाठी भाजपचा नवा डाव

point

धैर्यशील कदम आहेत तरी कोण?

Dhairyasheel Kadam profile story  : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने धैर्यशील ज्ञानदेव कदम यांना उमेदवारी जाहीर केलीये. या जागेसाठी महायुतीमधील अनेक ज्येष्ठ आणि मातब्बर नेते इच्छुक होते, मात्र पक्ष नेतृत्वाने शेवटी कदम यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली. 

हेही वाचा : मुंबई: मुलगा दुधासाठी रडत होता, वडिलांनी दिलं फेकून अन्.. स्वत: दारूच्या नशेत

भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर कदम यांची प्रतिक्रिया 

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धैर्यशील कदम म्हणाले,  "हा माझ्या 32 वर्षांच्या कामाचा सन्मान आहे. पक्षात जो निर्णय घेतला जातो, त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे तिकीट मिळण्यापूर्वी आम्ही जे चार ते पाच जण इच्छुक होतो, त्या सर्वांचाच हा विजय आहे असे मी मानतो. निवडणुकीच्या काळात सर्वजण पक्षाच्या पाठीशी एकदिलाने उभे राहतील", असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : गडचिरोली : समलैंगिक संबंधांचा थरारक अंत, सतीशने काय केलं?

हे वाचलं का?