गडचिरोली : समलैंगिक संबंधांचा थरारक अंत, सतीशने काय केलं?
Gadchiroli Crime : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात समलैंगिक संबंधातून लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका युवकाने आपल्या मित्राची धारदार चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गडचिरोली : समलैंगिक संबंधांचा थरारक अंत,
सतीशने काय केलं?
Crime News : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात एका अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेली मैत्रीचे रूपांतर समलैंगिक प्रेमसंबंधात झाले. शेवटी या प्रेम प्रकरणाचा शेवट एका हत्याप्रकरणात झालाय. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात...
हेही वाचा : भाजपने बसवराज पाटील यांना उमेदवारी, आता काँग्रेसने तरुण तुर्क नेता मैदानात उतरवला
लग्नास नकार दिल्याच्या रागातून केला खून
समलैंगिक प्रेमसंबंध बहरलेले असताना लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका युवकाने आपल्याच मित्रावर चाकूने सपासप वार करून हत्या केली आहे. रविवारी पहाटे देवदा गावाच्या जवळ घडलेल्या या घटनेने माणुसकीला काळीमा फासली असून, स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत आरोपीला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
हेही वाचा : Astrology : गुरूचा कर्क राशीत प्रवेश, हंस महापुरुष राजयोगाची निर्मिती; 'या' राशींचे भाग्य बदलेल









