Monsoon Update: 50 किमी प्रतितास वेगाने 'या' भागात धडकणार मान्सून, अलर्ट जारी!

मुंबई तक

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात हीट वेवचा रेड अलर्ट हवामान खात्याने दिला होता. मात्र मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर यासह विदर्भातल्या जिल्ह्यांना आता पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

ADVERTISEMENT

monsoon set to strike several parts of maharashtra at speeds of 50 kmh orange alert issued
Monsoon Update
google news

मुंबई: देशभरातील शेतकरी आणि नागरिक यंदाच्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची अपेक्षित तारीख उलटून गेली असतानाही अद्याप मान्सूनचे अधिकृत आगमन झालेले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच एल निनोचा प्रभाव आणि सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे.

केरळमध्ये मान्सूनला विलंब

हवामान खात्याने सुरुवातीला 26 मेपर्यंत केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र ही तारीख उलटून गेल्यानंतरही मान्सून केरळपर्यंत पोहोचलेला नव्हता. त्यामुळे हवामान विभागाने नवीन अंदाज जाहीर करत 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Weather : राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा हाहाकार, 23 जिल्ह्यांचं खरं नाही

मान्सूनच्या प्रवासाचा विचार केला तर 22 मेपर्यंत अंदमान-निकोबार बेटांमध्ये मान्सूनचे आगमन झाले होते. त्यानंतर 26 मेपर्यंत मान्सून श्रीलंकेपर्यंत पोहोचला. पुढे 30 मेपर्यंत त्याची प्रगती सुरू राहिली असली तरी केरळमध्ये आगमन होण्यासाठी आणखी काही काळ लागला.

हवामान अभ्यासक सखा सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्र, कोमोरीन परिसर तसेच बंगालच्या उपसागराच्या अधिक भागांमध्ये पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढील प्रगतीस पोषक परिस्थिती निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

हे वाचलं का?