भाजपने बसवराज पाटील यांना उमेदवारी, आता काँग्रेसने तरुण तुर्क नेता मैदानात उतरवला
Maharashtra Politics : भाजपने धाराशिव–बीड–लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद मतदारसंघातून बसवराज पाटील यांना उमेदवारी दिलीये. तर काँग्रेसने तरुण तुर्क नेता मैदानात उतरवला
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजपने बसवराज पाटील यांना उमेदवारी
आता काँग्रेसने तरुण तुर्क नेता मैदानात उतरवला
Maharashtra Politics, गणेश जाधव : धाराशिव–बीड–लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री बसवराज पाटील (मुरूमकर) यांची, तर काँग्रेसने युवा नेते महेश देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात अनुभवी नेतृत्व विरुद्ध युवा नेतृत्व अशी चुरशीची लढत रंगणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार धाराशिव जिल्ह्यातील हे उमरगा तालुक्यातील आहेत.
हेही वाचा : आधी गोड-गोड बोलली अन् नंतर घरी बोलवून केलं कांड, तरुणासोबत घडलं भयानक
भाजपची उमेदवार यादी
भाजपच्या 11 उमेदवारांची संपूर्ण यादी (मतदारसंघानुसार)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर
अमरावती : प्रवीण पोटे पाटील
सांगली-सातारा : धैर्यशील कदम
सोलापूर : राजेंद्र राऊत
अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे
छ. संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट
नांदेड : अमर राजूरकर
धाराशिव-बीड-लातूर : बसवराज पाटील
जळगाव : नंदकिशोर महाजन
नागपूर : डॉ. राजीव पोतदार
हेही वाचा : एक दिवसापूर्वी भाजपात आले, अन् थेट विधानपरिषेदची उमेदवारी









