आधी गोड-गोड बोलली अन् नंतर घरी बोलवून केलं कांड, तरुणासोबत घडलं भयानक
सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणे किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय आणून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आधी गोड-गोड बोलली अन् नंतर घरी बोलवून केलं कांड
तरुणासोबत घडलं भयानक
Crime News : सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणे किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय आणून देणारी एक धक्कादायक घटना बिहारची राजधानी पाटणा येथे उघडकीस आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका महिलेने तरुणाशी जवळीक साधली. आधी फ्रेंड रिक्वेस्ट, नंतर चॅटिंग आणि मग गोड बोलून त्या तरुणाचा विश्वास संपादन केला. ही मैत्री इतकी घट्ट झाली की, काही दिवसांतच त्यांनी एकमेकांना भेटण्याचे ठरवले. ती महिला अत्यंत विश्वासू आणि तिच्या बोलण्यात आपलेपणा वाटत असल्याने, तो तरुण कोणत्याही संशयाशिवाय तिला भेटायला गेला. परंतु, तिथे पोहोचताच त्याचे आयुष्य एखाद्या गुन्हेगारी चित्रपटासारखे बदलून गेले.
भेटायला गेला अन् अडकला
हा संपूर्ण प्रकार पाटण्याच्या रूपसपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या महिलेने त्याला भेटण्याच्या बहाण्याने एका निर्जन ठिकाणी बोलावले. तरुण तिथे पोहोचताच त्या महिलेने आणि तिच्या पतीने मिळून त्याला धमकावण्यास सुरुवात केली. काही समजण्याच्या आतच त्या दाम्पत्याने तरुणाकडील सर्व रोकड आणि अंगावरील मौल्यवान सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे आणि लुटीमुळे हादरलेल्या पीडिताने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
हे ही वाचा : बुलढाणा : शिवानीचं बनावट हत्याकांड, आरोपी वडील अन् भावाची सुटका, पहिली प्रतिक्रियाही समोर
तरुणांना जाळ्यात ओढणे हाच मुख्य धंदा
घटनेचे गांभीर्य ओळखून नगर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रूपसपूर पोलिसांनी तात्काळ एक विशेष पथक तयार केले. पोलिसांनी पीडिताचा मोबाईल, कॉल डिटेल्स, सोशल मीडिया चॅट्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रावून थेट आरोपी जोडप्याचा माग काढला. पोलिसांनी कारवाई करत त्या महिलेला आणि तिच्या पतीला अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता पोलीसही थक्क झाले. हे दाम्पत्य सराईत गुन्हेगार असून, सोशल मीडियावरून लोकांना जाळ्यात ओढणे, विश्वास संपादन करणे आणि शेवटी भेटायला बोलावून लुटणे हाच त्यांचा मुख्य धंदा होता. रूपसपूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले.
हे ही वाचा : बार्शी : खेळपट्टी सपाट करण्यासाठी रोलर फिरवू लागले, 14 वर्षीय मुलगा खाली पडला अन्...
10 लाखांची रोकड जप्त
जेव्हा पोलिसांनी लुटलेल्या दागिन्यांचा शोध सुरू केला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हे दागिने ज्या व्यक्तीला विकण्यात आले होते, त्यालाही पोलिसांनी शोधून काढून अटक केली आहे. अशा प्रकारे या टोळीतील तिसरा म्होरक्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी या तिघांच्या ताब्यातून तब्बल 10 लाख रुपयांची रोकड आणि लाखो रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या टोळीने आतापर्यंत किती लोकांना लुटून कंगाल केले आहे, याचा शोध पोलीस घेत असून, सोशल मीडियावरील आभासी जगातील मित्रांवर आंधळा विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.









