'मी पोलीस उपनिरीक्षक आहे, माझ्यावर सासऱ्यानेच..', अधिकाऱ्यावर अनन्वित अत्याचार

मुंबई तक

woman sub inspector alleges rape by father in law : एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या सासरच्या मंडळींवर बलात्कार आणि हत्येच्या प्रयत्नाचा गंभीर आरोप केला असून, पोलिसांनी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

woman sub inspector alleges rape by father in law
woman sub inspector alleges rape by father in law
google news

बातम्या हायलाइट

point

'मी पोलीस उपनिरीक्षक आहे, माझ्यावर सासऱ्यानेच..'

point

अधिकाऱ्यावर अनन्वित अत्याचार

woman sub inspector alleges rape by father in law :   एका महिला उपनिरीक्षकाने आपल्याच सासरच्या मंडळींविरुद्ध केलेल्या गंभीर तक्रारीने संपूर्ण पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे.  महिला उपनिरीक्षकाने तिचा सासरा, पती, सासू आणि नणंदेवर अत्यंत भयानक आरोप केले आहेत. सासरच्या मंडळींकडून तिला सातत्याने जातवाचक शब्द वापरून मानसिक आणि शारीरिक छळ दिला जात होता. तसेच तिला तिच्या पोलीस दलातील नोकरी सोडण्यासाठी वारंवार भाग पाडले जात होते. या साऱ्या प्रकरणाची तक्रार चार दिवसांपूर्वी पोलिसांकडे करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही, असा धक्कादायक आरोप पीडित महिलेने केला आहे. आता या प्रकरणाने जोर धरल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : गावातल्या दुसऱ्या धर्मातील मुलावर जीव जडला, निष्पाप क्रांतीसोबत भयंकर घडलं!

सासरच्या मंडळींनी गाठली क्रूरतेची सीमा 

पीडित महिला मूळची लखनौमधील रहिवासी असून तिचे शुभम सिंह या तरुणाशी 14 फेब्रुवारी 2025 रोजी लग्न झाले होते. हे एक आंतरजातीय विवाह (इंटर-कास्ट मॅरेज) असल्याने सासरच्या मंडळींचा तिला लग्नानंतरपासूनच तीव्र विरोध होता. तक्रारीनुसार, तिला आपल्या सासरी अनेक वेळा अपमानित केले गेले.  महिला उपनिरीक्षकाने नोकरी सोडण्यास विरोध केल्यामुळे तिच्या सासू-सासऱ्यांनी आणि पतीने क्रूरतेची सीमा गाठली. सासऱ्याने चक्क त्यांच्याकडील परवानाधारक बंदुकीच्या धाकावर सून असलेल्या  महिला उपनिरीक्षकावर  बलात्कार केल्याचा अत्यंत संतापजनक आरोप तिने केला आहे. ही सर्व आपबीती तिने आपल्या पतीला सांगितल्यावर त्याने तिला साथ देण्याऐवजी, उलट तिलाच धमकावून हे सर्व प्रकरण दाबून टाकण्यास आणि तोंड बंद ठेवण्यास सांगितले.

हेही वाचा : बाप मुलीच्या सासरी गेला अन् हादरलाच, सहा महिन्यांपूर्वीच सगळं संपलं होतं; दोषी कोण?

हे वाचलं का?