पुणे : दारु पिऊन आलेल्या महिलेचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा VIDEO
Pune Crime News : पुणे शहरातील नऱ्हे पोलीस चौकीत आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याच्या कारणावरून एका 41 वर्षीय महिलेने दारूच्या नशेत गोंधळ घातला. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : दारु पिऊन आलेल्या महिलेचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा VIDEO
अपेक्षित तक्रार दाखल केली नसल्याने झाली आक्रमक
Pune Crime News : पुणे शहरातील नऱ्हे पोलीस चौकीत आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी आलेल्या एका 41 वर्षीय महिलेने पोलीस कर्मचाऱ्यांसमोर मोठा गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या तक्रारीची पोलीस दखल घेत नसल्याच्या आणि आपल्याला सतत डावलले जात असल्याच्या संतापातून या महिलेने पोलीस चौकीतच आरडाओरडा करून अरेरावीला सुरुवात केली. ही महिला मद्यधुंद अवस्थेत असल्याने तिने पोलीस कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ करत पोलीस चौकीचे कामकाज विस्कळीत केले.
हेही वाचा : 'माझा नवरा तृतीयपंथी..' नवविवाहितेच्या सुखी संसाराच्या स्वप्नाचा शेवट; नेमकं काय घडलं?
महिला आक्रमक कशामुळे झाली?
नऱ्हे पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षकांच्या तक्रारीवरून आता या महिलेवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी ही महिला तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत आली होती, त्यावेळी पोलिसांनी तिच्या सांगण्यावरून समोरील व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. मात्र, आपल्याला अपेक्षित असलेला गुन्हा का? दाखल करण्यात आला नाही, या कारणावरून ती महिला आक्रमक झाली आणि तिने पोलीस चौकीत धिंगाणा घातला.
हेही वाचा : Maharashtra Weather : जून महिन्यात मान्सूनचं टेन्शन वाढलं, 29 जिल्ह्यांवर मोठं संकट









