चंद्रपूर : 'सरप्राइज गिफ्ट', मल्टिपल अफेअर, शितलच्या घरात घुसला अन्
Chandrapur Crime News : चंद्रपूरमध्ये व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने 'सरप्राइज गिफ्ट' देण्याच्या बहाण्याने प्रेयसीच्या डोळ्यावर पट्टी बांधून धारदार चाकूने गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चंद्रपूर : 'सरप्राइज गिफ्ट',
मल्टिपल अफेअर, शितलच्या घरात घुसला अन्
Chandrapur Crime News : चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. व्हॉट्सॲपवर ब्लॉक केल्याच्या रागातून एका नराधम प्रियकराने आपल्या प्रेयसीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. 'सरप्राइज गिफ्ट' देण्याच्या बहाण्याने प्रेयसीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून धारदार चाकूने तिचा गळा चिरून खून करणाऱ्या या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि राजुरा पोलिसांनी तेलंगणातून शिताफीने अटक केली आहे.
हेही वाचा : भाजपने बसवराज पाटील यांना उमेदवारी, आता काँग्रेसने तरुण तुर्क नेता मैदानात उतरवला
राजेश व्यंकटी अट्टेला (वय 35, रा. रेपनापल्ले, चेन्नूर, तेलंगणा) असे या अटकेतील आरोपीचे नाव आहे, तर शीतल रणधीर कुंभारे असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नातेसंबंधातील संशय आणि रागाचे भयानक स्वरूप पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
मध्यरात्री राजेश गुपचूप तिच्या घरी पोहोचला
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल आणि राजेश यांचे 2009 पासून प्रेमसंबंध होते आणि शीतलचे 2014 मध्ये लग्न झाले असूनही त्यांचे हे संबंध सुरूच होते. अलीकडच्या काळात दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता आणि शीतलने राजेशला व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले होते. तिला दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचे संशय राजेशला होता, ज्यामुळे तो प्रचंड चिडला होता. काही दिवसांपूर्वी शीतलने राजेशला पुन्हा अनब्लॉक केले होते. शीतलची आई आणि भाऊ देवदर्शनाला गेल्यामुळे ती आपली लहान मुलगी आणि राजेशसोबत घरी एकटी होती, याचा फायदा घेत 28 मे च्या मध्यरात्री राजेश गुपचूप तिच्या घरी पोहोचला.









