कल्याणमध्ये सैराट! आंतरजातीय विवाह केलेल्या गायत्रीला माहेरी बोलावलं अन्...

मिथिलेश गुप्ता

Kalyan Crime News : मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरुन बापाने तिची क्रूरपणे हत्या केली आहे. विशेष म्हणजे तिला माहेरी बोलावून संपवण्यात आलाय.

ADVERTISEMENT

Kalyan Crime News
Kalyan Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

कल्याणमध्यै सैराट! आंतरजातीय विवाह

point

गायत्रीला माहेरी बोलावलं अन्...

Kalyan Crime News : कल्याण पश्चिमेतील पारेकरवाडी परिसरातील रचना रॉयल इमारतीत घडलेल्या मुलीच्या हत्येच्या प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन दिवसांपासून फरार असलेल्या आरोपी वडिलांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आलंय. मुलीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

हेही वाचा : प्रपोजल नाकारल्याने चिडला, सरकारी क्लार्कने लेडीज टॉयलेटमध्ये लावला कॅमेरा; अन्...

विवाहित मुलीला क्रूरपणे संपवलं 

पोलिसांच्या माहितीनुसार, विनोद वसईकर यांनी आपल्या विवाहित मुलगी गायत्री वसईकर हिची धारदार शस्त्राने हत्या केली होती. गायत्री लग्नानंतर काही दिवसांसाठी माहेरी आली होती. याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. हत्येनंतर विनोद वसईकर घटनास्थळावरून फरार झाले होते. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत अखेर पोलिसांनी विनोद वसईकर यांना ताब्यात घेण्यात यश मिळवले. 

हेही वाचा : Astrology : गुरूचा कर्क राशीत प्रवेश, हंस महापुरुष राजयोगाची निर्मिती; 'या' राशींचे भाग्य बदलेल

हे वाचलं का?