बायकोचं दुसऱ्याच पुरुषावर प्रेम, नवऱ्याला करंट देऊन... मोठं कांड
Crime News : पोलिसांनी वर्षभरापासून गूढ असलेल्या खूनाचा उलगडा केला आहे. या प्रकरणात सुरूवातीला एक साधा अपघात किंवा दुर्घटना वाटणारी ही घटना, एका अनैतिक संबंधावरून झालेल्या वादातून रचलेला एक भयंकर खुनाचा कट होता. प्रेमात बुडालेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून हा गुन्हा घडवून आणला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दारू पाजून बेशुद्ध करत नवऱ्याचा काटा काढला
पत्नीसह चार आरोपींना अटक
Crime News : छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील बांदे पोलिसांनी वर्षभरापासून गूढ असलेल्या खूनाचा उलगडा केला आहे. या प्रकरणात सुरूवातीला एक साधा अपघात किंवा दुर्घटना वाटणारी ही घटना, एका अनैतिक संबंधावरून झालेल्या वादातून रचलेला एक भयंकर खुनाचा कट होता. प्रेमात बुडालेल्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून हा गुन्हा घडवून आणला होता. मात्र, पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी एका वर्षानंतर संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक केली.
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : 15 जूनपर्यंत नालेसफाई करण्याचे लक्ष, पुणे महापालिकेची कसोटी
पत्नीसह चार आरोपींना अटक
बांदे पोलिसांनी खुनाची सूत्रधार पत्नीसह चार आरोपींना अटक केली. या प्रकरणात बांदे परिसरात दल्लीराजहरा येथील रहिवासी असलेल्या मृत व्यक्ती मुकेश विश्वासचा मृतदेह अत्यंत संशयास्पद परिस्थिती आढळून आला होता. प्राथमिक तापासातून घटनास्थळी कोणताही प्रत्यक्षदर्शी किंवा ठोस पुरावा उपलब्ध नव्हता, ज्यामुळे हे प्रकरण गोंधळात टाकणारे ठरले.
मुकेशला विजेचा झटका
दरम्यान, शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक सत्य उघडकीस आलं आहे. मुकेशचा मृत्यू हा विजेचा झटका लागल्याने झाला होता. त्याच्या बोटांवर आणि हातांवर खोलवर जखमांच्या खुणा होत्या. या अहवालानंतर, पोलिसांनी मृताच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंधांचा उलगडा करण्यास सुरूवात केली, ज्यामुळे तपासाची संपूर्ण दिशा बदलून गेली. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषन आणि कॉल डिटेल्सच्या तपासणीतून असे उघडकीस आले की, मृताची पत्नी सरस्वती बिस्वास हिचे चिकलकासा येथील रहिवासी असलेल्या इंद्रजित दारासोबत बऱ्याचकाळापासून अनैतिक प्रेमसंबंध होते. जेव्हा मुकेश बिस्वासला याची माहिती मिळाली तेव्हा कुटुंबात सतत संघर्ष आणि वादाचे वातावरण निर्माण झाले.
दारू पाजून बेशुद्ध करत नवऱ्याचा काटा काढला
संबंधित परिस्थिती इतकी बिघडली की, मुकेशने पत्नीपासून कायदेशीर घटस्फोटाची तयारी केली. त्याच्या मार्गातील हा अडथळा दूर करण्यासाठी पत्नीने तिचा प्रियकर इंद्रजितच्या मदतीने, हत्येचा कट रचला होता. कटाचा भाग म्हणून मुकेशला आरोपी रणजितच्या घरी बोलावले, नंतर दारू पाजून बेशुद्ध केले. तो बेशुद्ध झाल्यानंतर मशीनमध्ये वापरलेल्या सर्व्हिस व्हायरमधून उच्च व्होल्टेजचा प्रवास सोडला, ज्यात त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या खूनानंतर आरोपीने मृतदेह सोडून घटनास्थळावरून पळ काढला.









