मोठी बातमी : कॅबिनेट बैठकीत कर्जमाफी योजनेस मंजुरी, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज होणार माफ?
Farmer loan waiver scheme : महाराष्ट्र सरकारने 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देत 2 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे 65 लाखांहून अधिक खात्यांना लाभ मिळणार असून, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मोठी बातमी : कॅबिनेट बैठकीत कर्जमाफी योजनेस मंजुरी
कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज होणार माफ?
Farmer loan waiver scheme : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, 2 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भाजपप्रणित महायुती सरकारने निवडणुकीत दिलं होतं आश्वासन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या माध्यमातून 65 लाखांहून अधिक बँक खात्यांना लाभ मिळणार असून, यात सुमारे 36,585 कोटी रुपयांची कर्ज माफी केली जाणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपप्रणित महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मोठे आश्वासन दिले होते, त्याचीच पूर्तता या निर्णयाद्वारे करण्यात आली आहे.
हेही वाचा : Govt Jobs : सीडॅकमध्ये 900 हून अधिक जागांची भरती, काय आहेत पात्रतेचे निकष?
नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा
केवळ कर्जमाफीच नव्हे, तर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांचाही सरकारने विचार केला आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.









