Govt Jobs : सीडॅकमध्ये 900 हून अधिक जागांची भरती, काय आहेत पात्रतेचे निकष?

मुंबई तक

C-DAC मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 900 हून अधिक रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Government Jobs
Government Jobs
google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : सीडॅकमध्ये 900 हून अधिक जागांची भरती

point

काय आहेत पात्रतेचे निकष?

Government Jobs : केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची आघाडीची वैज्ञानिक संस्था असलेल्या 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग' (C-DAC) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सी-डॅक अंतर्गत'प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट टेक्निशियन, प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ आणि प्रोजेक्ट इंजिनिअर यांसह विविध पदांच्या एकूण 900 हून अधिक रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मेगा भरतीमुळे सरकारी क्षेत्रात आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या देशभरातील पात्र उमेदवारांना मोठी संधी निर्माण झाली आहे.

काय आहे शैक्षणिक पात्रता?

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित शाखेतील बी.ई. (BE), बी.टेक. (B.Tech), एम.ई. (ME), एम.टेक. (M.Tech) किंवा पीएच.डी. (Ph.D) धारक उमेदवारांना अर्ज करता येईल. याशिवाय व्यवस्थापकीय आणि इतर व्यावसायिक पदांसाठी सीए (CA), एलएलएम (LLM), सीएस (CS), सीएमए (CMA) किंवा एमबीए (MBA) उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. या शैक्षणिक पात्रतेसोबतच उमेदवारांकडे संबंधित कामाचा आवश्यक तो अनुभव असणे देखील बंधनकारक आहे.

हे ही वाचा : सोलापूर : 53 वर्षीय मौलानाने मदरशात 10 वर्षीय मुलीसोबत..., भयंकर प्रकरण!

नोकरीचे ठिकाण

वयोमर्यादेचा विचार केला तर 20 जून 2026 रोजी उमेदवारांचे वय पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. यामध्ये नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत देण्यात आली असून, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षे सूट मिळणार आहे. या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती दिली जाऊ शकते, म्हणजेच हे नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.

हे ही वाचा : संभाजीनगर : 25 वर्षीय तरुणाने 80 वर्षीय वृद्ध महिलेवर केला बलात्कार, पुढे..

अर्ज करण्यासाठी शुल्क नाही

या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क किंवा अर्ज फी घेतली जाणार नाही. इच्छुक उमेदवारांना सी-डॅकच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून असून, त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरतीसाठीची लेखी परीक्षा किंवा मुलाखतीचे वेळापत्रक प्रशासनाकडून नंतर स्वतंत्रपणे जाहीर केले जाईल, त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळेत आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

हे वाचलं का?