संभाजीनगर : 25 वर्षीय तरुणाने 80 वर्षीय वृद्ध महिलेवर केला बलात्कार, पुढे..

मुंबई तक

Chhatrapati Sambhajinagar crime : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. 25 वर्षीय तरुणाने एका 80 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भीषण घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

ADVERTISEMENT

chhatrapati sambhajinagar crime
chhatrapati sambhajinagar crime
google news

बातम्या हायलाइट

point

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून लज्जास्पद प्रकार उघडकीस

point

25 वर्षीय तरुणाने 80 वर्षीय वृद्ध महिलेचे केले लैंगिक शोषण

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. 25 वर्षीय तरुणाने एका 80 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या भीषण घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच, पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : Astrology : 12 वर्षानंतर गजलक्ष्मी राजयोगाचा 'या' राशींवर मोठा प्रभाव

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय व्हॅली रूग्णालयात नेण्यात आले. या घृणास्पद गुन्ह्याची माहिती पाचोड आणि असपासच्या परिसरात समजताच एकच गोंधळ उडाला होता. या घटनेनं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पचोड पोलीस ठाणे परिसरातील संतापलेल्या नागरिकांनी आरोपी नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. 

छत्तीसगडमध्ये देखील असाच धक्कादायक प्रकार 

हे ही वाचा : 13 वर्षीय बहीण नदीत, तर 3 वर्षीय भाऊ विहिरीत सापडला; चिमुरड्यांचा काय दोष?

दरम्यान, असाच एक धक्कादायक प्रकार फेब्रुवारी महिन्यात धमतरी जिल्ह्यातून उघडकीस आला. एका 25 वर्षीय तरुणाने 86 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. हा घृणास्पद गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. घटनेवेळी वृद्ध महिलेचा मुलगा आणि सून कामावर गेले होते. ती घरात एकटीच होती. याचाच फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश केला, नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिलेला गंभीर अवस्थेत धमतरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

हे वाचलं का?