सोलापूर : 53 वर्षीय मौलानाने मदरशात 10 वर्षीय मुलीसोबत..., भयंकर प्रकरण!
Solapur Crime News : सोलापूरमधील एका मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 53 वर्षीय मौलानाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली असून, एमआयडीसी पोलिसांनी मौलानावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलीवरील कथित अत्याचारप्रकरणी मौलानावर पॉक्सोचा गुन्हा;
सोलापुरात संतापाची लाट
Solapur Crime News : सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धार्मिक शिक्षणासाठी मदरशात जाणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर त्याच मदरशातील 53 वर्षीय मौलानाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मौलाना मोहम्मद उमर मोहम्मद हुसेन रजवी (वय 53, रा. सोलापूर) असे या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा : 15 वर्षीय मुलीवर बापाचा बलात्कार, तीन वर्ष सगळं सहन केलं; कारण वाचून हादरुन जाल
मौलानाचे पीडित मुलीसोबत गैरवर्तन
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मौलानाने गेल्या काही काळापासून पीडित मुलीसोबत गैरवर्तन केले होते. एवढेच नव्हे तर, इतर काही अल्पवयीन मुलींशीही त्याने अयोग्य वर्तन केले असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिक्षणाच्या पवित्र ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे सोलापूर शहरात आणि विशेषतः नई जिंदगी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक शिक्षणासाठी पालकांनी आपल्या मुलांना विश्वास ठेवून पाठवलेल्या मदरशातच असा प्रकार घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा : मुलीच्या डॉक्टरकीसाठी जमीन विकली, पण शेतकरी बाप तिची बॉडी घेऊन परतला









