मुलीच्या डॉक्टरकीसाठी जमीन विकली, पण शेतकरी बाप तिची बॉडी घेऊन परतला
Delhi building collapse : एका शेतकऱ्याने मुलीच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी आपली जमीन विकली होती, परंतु दिल्लीतील इमारत दुर्घटनेत त्या 24 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलीच्या डॉक्टरकीसाठी जमीन विकली
पण शेतकरी बाप तिची बॉडी घेऊन परतला
Delhi building collapse : आपली मुलगी 'एकता' हिने डॉक्टर व्हावे, असे एका सामान्य शेतकऱ्याचे त्याची मुलगी असे एक मोठे स्वप्न होते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी एकताचे वडील रमेश चंद यांनी पाच वर्षांपूर्वी आपल्या मालकीच्या जमिनीचा काही हिस्सा विकला होता. मुलीने पांढरा कोट घालून रुग्णांची सेवा करावी आणि कुटुंबाचे नशीब बदलावे, या आशेने त्यांनी आपल्या सर्व बचतीचा गुंतवणूक म्हणून वापर केला होता. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. दक्षिण दिल्लीतील साकेत जवळील सैदुलजाब भागात शनिवारी रात्री झालेल्या चार मजली इमारत कोसळली. यामध्ये एकताचा दुर्दैवी अंत झाला आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा : Pune Metro | NCP मध्ये खऱ्या अर्थाने 'पार्थ पर्व'ला सुरुवात; काकडेंच्या उमेदवारीची Inside Story
वडिलांशी फोनवर बोलली अन् नंतर ...
एकता केवळ 24 वर्षांची होती. शनिवारी दुपारी तिने आपल्या वडिलांशी फोनवर सुमारे 15 मिनिटे संवाद साधला होता. ती खूप आनंदी होती, असे रमेश चंद यांनी सांगितले. मात्र, त्याच रात्री 9 वाजता त्यांना एकताच्या एका मित्राचा फोन आला की ती राहत असलेल्या भागातील एक इमारत कोसळली आहे. एकता जेवणासाठी बाजूच्याच 'आंटी वाला किचन' कॅन्टीनमध्ये गेली असताना ही दुर्दैवी घटना घडली. ही बातमी मिळताच रमेश चंद यांनी राजस्थानमधील अलवारमधून दिल्लीकडे धाव घेतली, परंतु नियतीने त्यांच्या मुलीला त्यांच्यापासून हिरावून नेले होते.
हेही वाचा : Astrology : 12 वर्षानंतर गजलक्ष्मी राजयोगाचा 'या' राशींवर मोठा प्रभाव









