भाऊ गेला अन् दिरांनी वहिनीला एकटं गाठलं, पुढे घडलं नको तेच

मुंबई तक

आपल्या विधवा वहिनीवर दोन दिरांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या हे दोन दीर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

भाऊ गेला अन् दिरांनी वहिणीला एकटं गाठलं,

point

पुढे घडलं नको तेच

Crime News : एका विधवा महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित महिलेने तिच्या नात्यातील दोन दिरांवर वेगवेगळ्या वेळी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  छत्तीसगडमधील गौरेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे.

दोन दिरांनी केले अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे सुमारे 10 वर्षांपूर्वी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर ती एकटीच राहत होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्या नात्यात लागणाऱ्या दोन वेगवेगळ्या दिरांनी वेगवेगळ्या प्रसंगी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेने या घटनेविरोधात आवाज उठवत गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला तिला यश आले नाही. पहिल्या तक्रारीनंतर महिला काही काळासाठी बाहेर गावी गेली होती, ज्यामुळे पोलीस तिच्याशी संपर्क साधू शकले नव्हते. मात्र, ती परत आल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली.

हे ही वाचा : सांगली : वरिष्ठ लिपिकाची महिला सहकाऱ्याकडे नको ती मागणी, एसटी विभागीय कार्यालयात काय घडलं?

दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

महिलेची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही घटनांचा तपास वेगवेगळ्या पातळीवर केला जात असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी शनिप रात्रे यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, पीडितेच्या तक्रारीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगितले. यातील पहिल्या प्रकरणात एका आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुसऱ्या प्रकरणातही कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई केली जात आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : वारं फिरलं, राज्याच्या दिशेनं घोंगावणार संकट, 23 जिल्ह्यांना मोठा अलर्ट

फरार दिरांचा शोध सुरु.

पोलीस ठाणे प्रभारींनी सांगितले की, दोन्ही गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेणे सुरु केले आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके सातत्याने ठिकठिकाणी छापे टाकत आहेत. दोन्ही आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पीडितेचा जबाब आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
 

हे वाचलं का?