Maharashtra Weather : वारं फिरलं, राज्याच्या दिशेनं घोंगावणार संकट, 23 जिल्ह्यांना मोठा अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व पावसाची परिस्थिती दिसून येत आहे. लवकरच राज्यात मान्सून दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात मान्सूनपूर्व पावसाची परिस्थिती
जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात मान्सूनपूर्व पावसाची परिस्थिती दिसून येत आहे. लवकरच राज्यात मान्सून दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2 जून 2026 रोजी 23 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट वर्तवला. तसेच कोकणात 5, उत्तर महाराष्ट्रात 4, पश्चिम महाराष्ट्रात 2, मराठवाड्यात 4 आणि विदर्भात 8 जिल्ह्यांना अलर्ट वर्तवण्यात आला. जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.
कोकण
कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि मुंबई या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. काही भागांत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची नोंद होऊ शकते.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना यलो अलर्ट वर्तवण्यात आला आला आहे. याच विभागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या विभागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट वर्तवण्यात आला असून काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.









