14 वर्षीय मुलीवर 20 दिवस कुलूपबंद घरात नको तेच.. लाज आणणारा प्रकार

मुंबई तक

Crime news : शाळेत जाणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 20 दिवस सामहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्राकर उघडकीस आला. संबंधित प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, तीन तरुणांनी तिचे अपहरण करत नंतर पीडितेला ओलीस ठेवले.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुलगी सायंकाळपर्यंत घरी परतलीच नाही

point

14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामहिक अत्याचार

Crime News : शाळेत जाणाऱ्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 20 दिवस सामहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्राकर उघडकीस आला. संबंधित प्रकरणात तिच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, तीन तरुणांनी तिचे अपहरण करत नंतर पीडितेला ओलीस ठेवलेत. पोलिसांपासून बचाव व्हावा यासाठी ते सतत जागा बदलत होते. सुरक्षित जागेच्या शोधात असताना, एका तरुणाच्या कुलूपबंद घरात तिला ठेवण्यात आले होते, मात्र तपासादरम्यान ती सापडलीच. ही घटना उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आहे.

हे ही वाचा : 12 वर्षांची मुलगी लघुशंकेसाठी उठली, दोघांनी मिळून बंदुकीचा धाक दाखवत जंगलात...

नेमकं काय घडलं? 

सोमवारी, पोलिसांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेतला आणि दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. कुटुंबीयांचा असा आरोप की, पोलीस हे प्रकरण मिटवण्यासाठी सातत्याने त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम करत आहेत. विद्यार्थिनीच्या आईने सांगितलं की, पोलिसांनी मिळून विद्यार्थिनीला धमकावले होते, नंतर तिच्याकडून स्वत:च्या विरोधात व्हिडिओ बनवला आणि नंतर पोलिसांच्या गाडीत टाकून नेले. 

मुलगी सायंकाळपर्यंत घरी परतलीच नाही

चौबेपूर पोलीस ठाणे परिसरातील गावात अल्पवयीन मुलगी ही 11 मे रोजी संशयास्पदपणे बेपत्ता झाली. शाळेत गेलेली मुलगी सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने, तिच्या आईने तिचा शोध सुरू केला, कुटुंबीय व इतर नातेवाईकांना याबाबतची माहिती मिळाली होती. पीडित विद्यार्थिनी बरेच दिवस होऊन गेले तरीही परतली नाही, तेव्हा या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

महिलेनं सांगितलं की, नवऱ्याचे आधीच निधन झाले होते, नंतर मुलगी बेपत्ता झाली होती. तिने तिच्या सर्व नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र त्या मुलीचा कुठेही शोध लागला नाही. तिला काही लोकांवर अधिक संशय होता आणि तिने पोलिसांना त्यांची नावे दिली होती, पण पोलिसांनी त्याकडे फार लक्ष दिले नाही.