जालना हादरलं! विम्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव, कारमध्ये कोणाचा दिला बळी?

मुंबई तक

Jalna Crime News : जालना जिल्ह्यात विम्याची रक्कम आणि कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून दुसऱ्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

जालना हादरलं! विम्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव,

point

कारमध्ये कोणाचा दिला बळी?

Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कारला आग लागून व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना 31 मे 2026 रोजी घडली होती. सुरुवातीला हा प्रकार अपघाती वाटत असल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, जालना पोलिसांनी केलेल्या तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपासानंतर या घटनेमागील अत्यंत धक्कादायक सत्य समोर आले असून, हा अपघात नसून एक नियोजनबद्ध खून असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा : सांगली : वरिष्ठ लिपिकाची महिला सहकाऱ्याकडे नको ती मागणी, एसटी विभागीय कार्यालयात काय घडलं?

स्वतःच्या मृत्यूचा रचला होता बनाव

तपासात समोर आलेली माहिती अशी की, नितीन प्रभाकर गवळी याने विम्याची मोठी रक्कम मिळवण्यासाठी आणि कर्जाच्या विळख्यातून सुटका करून घेण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला होता. या कटासाठी त्याने अमित राजू फुलारे आणि आकाश  गवळी यांना सोबत घेऊन नाशिक येथील संदीप चौहाण या तरुणाचा गळा दाबून निर्घृण खून केला. त्यानंतर संदीपचा मृतदेह कारमध्ये ठेवून ती वाहनासह जाळून टाकण्यात आली, जेणेकरून मृतदेह नितीनचाच आहे असा सर्वांचा समज व्हावा.

हेही वाचा : नवऱ्याने बायकोला कोंबडा बनवलं, अन् शेवटी नको ते केलं... मुंबईत 'ही' भलतीच घटना