खासदार शाहू महाराज नाराज, जरांगेंच्या भूमिकेवर स्पष्टच बोलले; नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

खासदार शाहू महाराज हे मनोज जरांगे यांच्यावर नाराज असल्याचं दिसून येत आहे. कोल्हापुरात याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मात्र याचवेळी महायुती सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला.

ADVERTISEMENT

google news

Shahu Maharaj On Manoj Jarange : खासदार शाहू महाराज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर नाराज असल्याची चर्चा आहे.मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीतून उपोषण सुरु केलंय. दुसरीकडे कोल्हापुरातील दसरा चौकात आज मराठा कार्यकर्ते एकत्र आले होते. खासदार शाहू महाराजांनीही उपस्थित रहात फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडत मनोज जरांगेंच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. मात्र कोल्हापूर गॅझेटबाबात जरांगे आतापर्यंत आग्रही न राहिल्याचा आरोप करत उघड नाराजीही व्यक्त केली. मनोज जरांगेंनी सरकारकडे ज्या मागण्या केल्या आहेत, त्यात सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थानांचा 1994 च्या धर्तीवर GR काढा ही प्रमुख मागणी आहे. मात्र या संस्थानांच्या आधी सुरुवातीला मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची जरांगेंनी मागणी केली होती. कोल्हापूरसह इतर संस्थानांबाबतची मागणी त्या यादीत नव्हती.आता त्याबद्दलचीच खंत शाहू महाराजांच्या मनात असल्याची चर्चा आहे. कोल्हापूर गॅझेटअभावी कोल्हापूरसह परिसरातील मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागू शकतं.त्याच काळजीपोटी शाहू महाराज हे सगळं बोलून गेल्याची शक्यता आहे. मात्र याचवेळी महायुती सरकारवर हल्लाबोल करत असतानाच काँग्रेसचे खासदार असणारे शाहू महाराज मनोज जरांगेंवरील नाराजी व्यक्त करतानाही दिसत आहेत.
 

हे वाचलं का?