दोन तरुण..,बकऱ्याची कुर्बानी अन् एन्काऊंटर; नेमकं काय घडलं?
Crime News : बाईक चालवण्याच्या किरकोळ वादातून 17 वर्षीय सूर्यप्रताप चौहान याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी असदचा नंतर पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला असून संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन तरुण..,बकऱ्याची कुर्बानी
अन् एन्काऊंटर; नेमकं काय घडलं?
Crime News : बाईक चालवण्याच्या कारणावरून सुरू झालेला किरकोळ वाद अवघ्या काही मिनिटांत रक्तरंजित हत्याकांडात बदलला. 28 मे रोजी दुपारी साधारण तीनच्या सुमारास 17 वर्षीय सूर्यप्रताप चौहान आणि 19 वर्षीय असद यांच्यात बाईक चालवण्यावरून वाद झाला. सुरुवातीला हा वाद साधा भांडणाचा प्रकार असल्याचे वाटत होते. पण पुढे काय घडलंय? जाणून घेऊयात...
हेही वाचा : Pune Metro | NCP मध्ये खऱ्या अर्थाने 'पार्थ पर्व'ला सुरुवात; काकडेंच्या उमेदवारीची Inside Story
“बकऱ्याची कुर्बानी पाहिली आहे का?”
सर्वांना वाटलं दोघांमधील वाद किरकोळ होता. पण काही वेळाने असद तेथून निघून गेला आणि उपस्थित लोकांनाही प्रकरण मिटल्याचे वाटले. मात्र सुमारे अर्ध्या तासानंतर असदने सूर्यप्रतापला फोन करून “बकऱ्याची कुर्बानी पाहिली आहे का?” असा प्रश्न विचारत त्याला कुर्बानी पाहण्यासाठी बोलावले. सूर्यप्रताप आणि त्याचा मित्र आयुष असदच्या सांगण्यावरून तेथे गेले. मात्र एका गल्लीत पोहोचताच असद आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना घेरले. त्यावेळी असदच्या वडिलांनीच मुलाला सूर्यप्रतापची “कहाणी संपव” असे सांगून चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर असदने सूर्यप्रतापच्या पोटात चाकू भोसकला. जीव वाचवण्यासाठी आयुष तेथून पळून गेला, तर सूर्यप्रताप रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला.
हेही वाचा : Personal Finance: पोस्टाची कोणती स्कीम तुमच्यासाठी आहे जबरदस्त?









