महाराष्ट्र आता थांबणार नाही! मंत्रिमंडळ बैठकीतील तीन धडाकेबाज निर्णय

मुंबई तक

राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्याच्या पायाभूत सुविधा आणि उच्च शिक्षण क्षेत्राला बळ देणारे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

Maharashtra Cabinet Decisions
Maharashtra Cabinet Decisions
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र आता थांबणार नाही!

point

मंत्रिमंडळ बैठकीतील धडाकेबाज तीन निर्णय

Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्याच्या पायाभूत सुविधा आणि उच्च शिक्षण क्षेत्राला बळ देणारे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील रस्ते सुधारणा प्रकल्पांना गती देण्यासाठी जागतिक बँकांकडून मोठे कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचा एका नामांकित समूह विद्यापीठामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रातही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत

पहिल्या महत्त्वाच्या निर्णयात, 'मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-3' अंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना गती देण्यात येणार आहे. या प्रकल्पातील विविध कामांसाठी 'आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँके'कडून (AIIB) 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे कर्ज घेण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या आंतरराष्ट्रीय कर्जासोबतच या योजनेसाठी लागणाऱ्या राज्य शासनाच्या स्वनिधीच्या (राज्य निधी) प्रस्तावालाही बैठकीत मान्यता देण्यात आली असून, यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार आहे.

हे ही वाचा : सोलापूर : 53 वर्षीय मौलानाने मदरशात 10 वर्षीय मुलीसोबत..., भयंकर प्रकरण!

आंतरराष्ट्रीय बँकांचे अर्थसहाय्य

ग्रामीण भागासोबतच राज्यातील मुख्य रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी आणि सुधारणेसाठी दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय बँकांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी 'आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक' (AIIB) आणि 'न्यू डेव्हलपमेंट बँक' (NDB) या दोन्ही बँकांकडून प्रत्येकी 8 हजार 700 कोटी रुपयांचे मोठे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या दोन्ही बँकांकडून मिळणाऱ्या एकूण 17 हजार 400 कोटी रुपयांच्या निधीमुळे राज्यातील रस्ते सुधारणा आणि विकास कामांना आता कमालीची गती मिळणार आहे.

हे ही वाचा : 15 वर्षीय मुलीवर बापाचा बलात्कार, तीन वर्ष सगळं सहन केलं; कारण वाचून हादरुन जाल

उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावणार

उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबईतील 'हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ' या समूह विद्यापीठामध्ये (Cluster University) नव्याने सहा नामांकित महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामध्ये प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्ल असोमुल्ल विज्ञान महाविद्यालय, तसेच थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा आता या समूह विद्यापीठात 'घटक महाविद्यालये' म्हणून अधिकृत समावेश होणार आहे.
 

हे वाचलं का?