अभिजीत दिपके भारतात परतणार, जंतरमंतरवर आंदोलन करणार, तारीख ठरली!

मुंबई तक

Abhijit Dipke : NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलन करणार आहेत. 6 जून रोजी ते भारतात परतणार आहेत. जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगी मागण्यात येणार असून त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलंय.

ADVERTISEMENT

Abhijit Dipke
Abhijit Dipke
google news

बातम्या हायलाइट

point

अभिजीत दिपके भारतात परतणार

point

जंतरमंतरवर आंदोलन करणार, तारीख ठरली!

Abhijit Dipke  : NEET पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके आता भारतात परतणार आहेत. 6 जून रोजी शनिवारी सकाळी ते भारतात परतणार असून, शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणार आहेत.

हेही वाचा : जालना हादरलं! विम्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव, कारमध्ये कोणाचा दिला बळी?

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

अभिजित दिपके यांनी या आंदोलनाचे आवाहन करताना म्हटले आहे की, आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी एकत्र येत भारतीय संविधानाच्या मार्गावर चालत, शांततापूर्ण पद्धतीने शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे. आपण सर्वजण एकत्र आलो तर आपली मागणी निश्चितपणे ऐकली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गेली काही दिवस सोशल मीडियावर या मागणीसाठी मोठा जनआक्रोश दिसून येत असून, 8 लाख विद्यार्थ्यांनी या याचिकेला पाठिंबा दिला आहे. लखनौ, जयपूर आणि महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी आंदोलने होऊनही सत्ताधाऱ्यांवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : सांगली : वरिष्ठ लिपिकाची महिला सहकाऱ्याकडे नको ती मागणी, एसटी विभागीय कार्यालयात काय घडलं?

हे वाचलं का?