Maharashtra lok Sabha : भाजपने राज ठाकरेंना का सोबत घेतले? मोदींनीच दिले उत्तर
PM Modi on Raj Thackeray, MNN : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्याची भाजप प्रणित महायुतीला गरज का पडली, अशी चर्चा होतेय. त्यावर मोदींनी काय दिले उत्तर, वाचा...
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज ठाकरेंबद्दल नरेंद्र मोदी काय बोलले?
राज ठाकरेंना भाजपने सोबत का घेतले?
नरेंद्र मोदी यांचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान
PM Modi Maharashtra Lok Sabha election 2024 : एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सामील झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनाही भाजपने महायुतीत घेतले. त्यामुळे शिंदे, पवार सोबत असताना राज ठाकरेंची गरज भाजपला का पडली? असा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चिला जात आहे. त्याचे वेगवेगळे अर्थही लावले जात आहेत. पण, या प्रश्नाचं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच उत्तर दिलं आहे. (Why did bjp take support raj thackeray? narendra modi give answered)
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'लोकमत'ला मुलाखत दिली. लोकांच्या मनात प्रश्न आहे की, भाजपला विजयाची खात्री एवढी खात्री होती, तरी त्यांनी राज ठाकरेंना सोबत का घेतले? असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला.
राज ठाकरेंना भाजपने का घेतले सोबत?
या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले की, "मी आधीच सांगितल्याप्रमाणे देशाला जो सर्वोच्च प्राधान्य देतो, त्याचे आम्ही नेहमीच स्वागत करतो. गेल्या १० वर्षांपासून आम्ही स्वबळावर बहुमतात आहोत. मात्र, तरीही आम्ही कायमच नव्या मित्रांचे स्वागत केले आहे."
हे वाचलं का?
हेही वाचा >> मोदींचं 'ते' विधान ठाकरेंच्या जिव्हारी! म्हणाले, "माफ करणार नाही"
"आपल्या लोकशाहीसाठी हे चांगले आहे. अधिकाधिक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करणे केव्हाही चांगलेच असते. राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत. त्यांनी यापूर्वीही आम्हाला पाठिंबा दिला आहे", असे मोदी म्हणाले.
'त्या' सगळ्यांचं आम्ही स्वागत करू -नरेंद्र मोदी
या प्रश्नाला उत्तर देताना मोदी पुढे म्हणाले, "आम्ही देशासाठी चांगले काम केले आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. आमच्या विचारांना तसेच आमच्या द्रष्टेपणाला ते पाठिंबा देतात. महाराष्ट्राच्या विकासातही ते हातभार लावू शकतील, असे आम्हाला वाटते."
ADVERTISEMENT
हेही वाचा >> बारामतीतील मतदानानंतर शरद पवारांबद्दल अजित पवारांची भाषा का बदलली?
"हे एकत्र येणे केवळ सत्तेसाठी किंवा राजकीय गणितांसाठी आहे, असे नाही. लोकसेवेसाठी एकत्र येणे, हा त्यामागचा उद्देश आहे. वस्तुतः देशहितासाठी जो कुणी आमच्याकडे येईल, त्या प्रत्येकाचे आम्ही सहर्ष स्वागत करू", अशी भूमिका मोदींनी राज ठाकरेंना भाजपसोबत घेण्याबद्दल मांडली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT