Uddhav Thackeray: 'मोदीजी मी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही...', मोदींचं 'ते' वाक्य लागलं ठाकरेंच्या जिव्हारी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काय करण्यात आली आहे टीका?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका.
social share
google news

Uddhav Thackeray vs PM Modi: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या प्रचार सभांमधून शिवसेना (UBT)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदीही ठाकरेंना टार्गेट करत आहेत. मात्र, काल (10 मे) छत्रपती संभाजीनगरमधील सभेत उद्धव ठाकरेंनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. 'काहीही झालं तरी.. नरेंद्र मोदींना मी कधीही क्षमा करणार नाही.' असं उद्धव ठाकरे म्हणाले. (uddhav thackeray has responded to prime minister modi criticism saying fake shiv sena fake son see what exactly uddhav thackeray said)

ADVERTISEMENT

दोन दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटलं होतं की, 'बाळासाहेब ठाकरेंच्या नकली शिवसेनेची मुलं (संतान) आहेत.. जरा बाळासाहेबांना आठवून बघा..' असं विधान केलं होतं. पंतप्रधान मोदींचं हेच वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्या सर्वाधिक जिव्हारी लागलं.

पाहा छ. संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.. 

'मोदीजी.. तुम्ही वेडंवाकडं काही बोलता... आम्ही कधीही तुमच्या कौटुंबिक, खाजगी जीवनाबाबत बोललो नव्हतो. इच्छाही नाही. पण मोदीजी 2014 साली पंतप्रधान व्हावं यासाठी माझी पत्रावर सही घेतली.

हे वाचलं का?

'काल तुम्ही जे बोललात त्यासाठी मी तुम्हाला क्षमा करु शकत नाही.. माझा महाराष्ट्र तुम्हाला क्षमा करणार नाही. तुम्ही शिवसेनेला नकली म्हणालात.. एवढंच नाही तर तुम्ही मला बाळासाहेबांचा नकली संतान म्हणालात.. नकली संतान.. बोलताय.. तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकलात की काय?' 

'2014 साली तुम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा तुम्ही तुमच्या बुडाला खुर्ची चिकटवण्यासाठी घेतला होतात ना..'

हे ही वाचा>> 'मला डोळा मार, पवारांना डोळा मार..', ठाकरेंची PM मोदींवर टीका

'बरं मोदीजी तुमचं परवा माझ्याबाबत जे प्रेम उतू जात होतं की, तुम्ही मला ऑपरेशनचा सल्ला दिलात.. हे तर झूटच आहे म्हणा.. ते सोडून द्या..' 

ADVERTISEMENT

'तुम्ही माझी चौकशी करत होतात. पण जेव्हा मी माझ्या हाता-पायांची हालचाल करू शकत नव्हतो.. मोदीजी त्याच वेळेला तुमच्या चेले चपाट्यांना पुढे करून माझ्या पक्षात गद्दारीची बीजं रोवली.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'हरा#$%* नो कुठे फेडाल पापं, वाट्टोळं होईल..', अजितदादा संतापले!

'तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल याचा विचार केलात? गद्दारी करून तुम्ही चांगलं चाललेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलंत तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटलं असेल? म्हणून तुम्ही हिंदूहृदयसम्राटांच्या आत्म्याची चिंता करू नका.' 

'त्यांचे आशीर्वाद नसते ना तर आज तुम्हाला जे महाराष्ट्राने गुडघे टेकायला लावलेत ना ते टेकायला लागले नसते. आता मुंबईत रोड शो करणार आहेत. आले ना रस्त्यावर.. हा माझा महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावर फिरवल्याशिवाय राहणार नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT