मुलगा ऑस्ट्रेलियात स्थायिक अन् इकडे 99 वर्षीय आईचा खून, दूधवाल्याच्या एका कॉलमुळे उलगडलं हत्याकांड

मुंबई तक

Crime News : एका 99 वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करुन मृतदेह घरातीलच एका लोखंडी पेटीत लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जोगिंदर कौर असं या मृत महिलेचे नाव असून, या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. या वृद्ध महिलेचा मुलगा ऑस्ट्रेलियात राहतो. दोन दिवसांपासून आजींनी दूध घेतले नसल्याचे दूधवाल्याने मुलाला फोन करुन सांगतिले. यानंतर वृद्ध महिलेच्या हत्येचा उलगडा झाला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका व्यसनी तरुणाने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

मुलगा ऑस्ट्रेलियात स्थायिक तर इकडे 99 वर्षीय आईचा खून

point

दूधवाल्याच्या एका कॉलमुळे उलगडलं हत्याकांड

Crime News : एका 99 वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करुन मृतदेह घरातीलच एका लोखंडी पेटीत लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जोगिंदर कौर असं या मृत महिलेचे नाव असून, या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. या वृद्ध महिलेचा मुलगा ऑस्ट्रेलियात राहतो. दोन दिवसांपासून आजींनी दूध घेतले नसल्याचे दूधवाल्याने मुलाला फोन करुन सांगतिले. यानंतर वृद्ध महिलेच्या हत्येचा उलगडा झाला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका व्यसनी तरुणाने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

हे ही वाचा : 'माझ्या मृत्युनंतर तिची काळजी कोण घेणार?' ISRO च्या निवृत्त कर्मचाऱ्याने बायकोला संपवलं

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला आरोपी

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. जोगिंदर कौर या घरी एकट्याच राहत होत्या, तर त्यांचा मुलगा सुखदेव सिंह हा ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे. दोन दिवसांपासून दूधवाल्याने आजींनी दूध घेतले नसल्याची माहिती दिल्यानंतर संशय बळावला. परदेशात असलेल्या मुलाने घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, एक अनोळखी तरुण घरात शिरल्याचे दिसले आणि त्यानंतर आजी कुठेही कॅमेऱ्यात दिसल्या नाहीत. घाबरलेल्या मुलाने तातडीने गावकऱ्यांना आणि पोलिसांना संपर्क साधला.

लोखंडी पेटीत आढळला मृतदेह

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराची झडती घेतल्यानंतर एका लोखंडी पेटीत जोगिंदर कौर यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास चक्रे फिरवून गावातीलच डॅनियल नावाच्या तरुणाला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने चोरीच्या उद्देशाने घरात शिरून आजींची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी 90 हजार रुपये रोख आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे.

हे वाचलं का?