'माझ्या मृत्युनंतर तिची काळजी कोण घेणार?' ISRO च्या निवृत्त कर्मचाऱ्याने बायकोला संपवलं
ISRO Employee kills Wife : निवृत्तीनंतरचे आयुष्य शांततेत घालवण्याच्या वयात इस्रोच्या एका 65 वर्षीय माजी कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची राहत्या घरी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) निवृत्त कर्मचारी नागेश्वर राव यांनी बुधवारी सकाळी बेंगलोरमधील अवालहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या पत्नीचा टॉवेलने गळा आवळून खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'माझ्या मृत्युनंतर तिची काळजी कोण घेणार?'
ISRO च्या निवृत्त कर्मचाऱ्याने बायकोला संपवलं
ISRO Employee kills Wife : निवृत्तीनंतरचे आयुष्य शांततेत घालवण्याच्या वयात इस्रोच्या एका 65 वर्षीय माजी कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची राहत्या घरी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) निवृत्त कर्मचारी नागेश्वर राव यांनी बुधवारी सकाळी बेंगलोरमधील अवालहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या पत्नीचा टॉवेलने गळा आवळून खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
हे ही वाचा : मौलानाचा शेजारच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोट दुखू लागल्याने रुग्णालयात नेलं अन्
टॉवेलने गळा आवळून हत्या
65 वर्षीय नागेश्वर राव यांनी त्यांची पत्नी संध्याश्री यांची राहत्या घरी टॉवेलने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर राव घटनास्थळावरून पळून गेले नाहीत, तर त्यांनी स्वतःच एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करून या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी नागेश्वर राव यांना ताब्यात घेतले असून संध्याश्री यांचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
वैज्ञानिक नैराश्याने ग्रस्त
पोलीस उपायुक्त सैदुलु अदावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागेश्वर राव हे गेल्या काही काळापासून नैराश्याने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्राथमिक तपासानुसार, राव यांना स्वतःचे जीवन संपवायचे होते, परंतु आपल्या पश्चात पत्नीचे काय होईल, या विवंचनेतून त्यांनी आधी पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा त्यांचा विचार होता. या भीषण कृत्यामागे नैराश्याव्यतिरिक्त इतर कोणतेही ठोस कौटुंबिक कारण अद्याप समोर आलेले नाही.