तरुण पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरला, नवरा व्हीलचेअरवर... बाहेर येताच मृतदेह आढळला

मुंबई तक

Crime News : तरुणाने महिलेचे दागिने लुटून तिची निर्घृण हत्या केली. आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने व्हीलचेअर असलेल्या तिच्या वृद्ध पतीसमोर महिलेचा गळा चिरला, त्यानंतर महिलेच्या अंगावरील दागिने चोरले. घटनेनं परिसर हादरून गेला आहे. मृत महिलेचे नाव शोभा (वय 60) असे आहे. या प्रकरणातील आरोपी शिवकुमार (वय 35) याला पोलिसांनी अटक केली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाने महिलेचे दागिने लुटून केली निर्घृण हत्या

point

आरोपीने पीडितेच्या घरात शिरून चाकूने गळा चिरला

Crime News : एका तरुणाने महिलेचे दागिने लुटून तिची निर्घृण हत्या केली. आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने व्हीलचेअर असलेल्या तिच्या वृद्ध पतीसमोर महिलेचा गळा चिरला, त्यानंतर महिलेच्या अंगावरील दागिने चोरले. ही घटना बंगळुरुच्या बाहेरील भागात असलेल्या नेलमंगला येथील पीट स्ट्रीटवर घडली होती. घटनेनं परिसर हादरून गेला आहे. मृत महिलेचे नाव शोभा (वय 60) असे आहे. या प्रकरणातील आरोपी शिवकुमार (वय 35) याला पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा : राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेताच उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा?

फिजिओथेरपीच्या उपचारासाठी डॉक्टर घरी येत

प्राथमिक तपासातून समोर आले की, त्याने वृद्ध महिलेला लक्ष्य केले असता, 8 लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज होती. दरम्यान, या प्रकरणातील शोभा आणि तिच्या पतीला मुल नव्हतं, घरची संपूर्ण जबाबदारी शोभावरती होती. शोभाच्या पतीला फिजिओथेरपीच्या उपचारासाठी दररोज एक डॉक्टर त्यांच्या घरी येत होते. नेहमीप्रमाणे, मंगळवारी डॉक्टर आल्यावर खून झाल्याचे उघड झाले. 

आरोपीने पीडितेच्या घरात शिरून चाकूने गळा चिरला

घटनेच्या दिवशी दुपारी 4 वाजताच्या सुमारास शोभा बाजारातून घरी परतली होती. आरोपीने तिला पाहिले असता, तिच्या अंगावर दागिने होते. नंतर संबंधित आरोपी हा तिचा पाठलाग करत राहिला, त्याने तिच्या घरात घुसून चाकूने तिचा गळा चिरला. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

हे ही वाचा : बाजारात सोडतो म्हणून बाईकवर बसवलं, नवविवाहितेसोबत बंटीने केलं भयंकर कृत्य; नेमकं काय घडलं?

नेलमंगला टाउन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु करत गुन्हा दखल केला. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चाकू आणि मोबाईल फोन जप्त केला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp