राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेताच उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा?

ऋत्विक भालेकर

Uddhav Thackeray : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काल झालेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. नंदनवन या शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली होती. याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियात पोस्ट करुन दिली होती. दरम्यान, या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मनसेला वगळून आपल्या पक्षातील स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेताच उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

point

ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा?

Uddhav Thackeray : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काल झालेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. नंदनवन या शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली होती. याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियात पोस्ट करुन दिली होती. दरम्यान, या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मनसेला वगळून आपल्या पक्षातील स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे ही वाचा : "...भाऊ पळवला", राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शिंदेसेनेची प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?

कोण होणार स्वीकृत नगरसेवक?

ठाकरे  गटातर्फे साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक या तीन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र याआधी मनसेकडून यशवंत किल्लेदार यांनी उद्धव सेनेच्या तीन स्वीकृत नगरसेवकांच्या कोट्यातून मनसेला एक स्वीकृत नगरसेवक मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.  
 
मनसेच्या अपेक्षांवर पाणी

तिन्ही स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर निर्णय घेऊन उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या अपेक्षांवर पाणी सोडल्याची चर्चा सध्या सुरु आहे. 28 फेब्रुवारी रोजी या स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतरच ही घडमोड घडल्याने मनसे आणि ठाकरे गटात मिठाचा खडा पडला आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
 
हे वाचलं का?

    follow whatsapp