"...भाऊ पळवला", राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शिंदेसेनेची प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Raj Thackeray Meet Eknath Shinde : शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्ट करत ठाकरेंच्या सेनेवर टीका केली आहे. "माझा पक्ष पळवला…माझा बाप पळवला…आता माझा भाऊ पळवला !!!", असं म्हणत शितल म्हात्रे यांनी ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. 

ADVERTISEMENT

Eknath Shinde And Raj Thackeray
Eknath Shinde And Raj Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"...भाऊ पळवला",

point

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शिंदेसेनेची प्रतिक्रिया

point

नेमकं काय घडलं?

Raj Thackeray Meet Eknath Shinde : मुंबई महापालिकेची निवडणूक लढल्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळाले होते. महापालिकांच्या प्रचार सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेतून महायुतीवर कडाडून टीका केली होती. शिवाय, शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर 50 खोक्यांचे आरोप करण्यात आले होते. यावरही राज ठाकरेंनी भाष्य केलं होतं. त्यामुळे महायुती आणि राज ठाकरे यांच्यातील दुरावा वाढेल, असं बोललं जात होतं. मात्र, बुधवारी (दि.18) मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. याबाबतची माहिती एकनाथ शिंदे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली होती. दरम्यान, आता या भेटीवरुन शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं आहे. 

हेही वाचा : "सूनेत्राताईंना राष्ट्रवादीच्या अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांच्या सह्या, उर्वरित आमदार कोण आहेत?"

शितल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत 

शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्ट करत ठाकरेंच्या सेनेवर टीका केली आहे. "माझा पक्ष पळवला…माझा बाप पळवला…आता माझा भाऊ पळवला !!!", असं म्हणत शितल म्हात्रे यांनी ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. 

राज ठाकरेंच्या भेटीवेळी काय घडलं? शिंदेंनी फेसबुक पोस्टमधून सांगितलं 

"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. तसेच नंदनवन या बंगल्याच्या हेरिटेज वास्तूचे वेगळेपण जपत केलेल्या सुधारणांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या बंगल्यात लावलेल्या मुंबईतील जुन्या हेरिटेज वास्तूंच्या फोटो फ्रेम्सची त्यांनी बारकाईने पाहणी केली, आणि जुन्या मुंबईच्या आठवणींना उजाळा दिला", असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp