पॉवरच्या गोळ्या खाऊन राक्षस बनला, गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर मृतदेहावर बलात्कार; पोलीस तपासात मोठे खुलासे
Indore Crime News : पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे की, आरोपी पीयूषने 10 फेब्रुवारी रोजी द्वारकापुरी येथील अंकल गल्लीतील आपल्या खोलीवर गर्लफ्रेंडला बोलावले होते. व्हॅलेंटाईन वीकनिमित्त खास गिफ्ट देणार असल्याचे सांगून त्याने तिला तिथे आणले होते. खोलीत आल्यानंतर त्याने तिला आधी मॅगी बनवून दिली आणि त्यानंतर आपल्या कटकारस्थानाला सुरुवात केली. पोलीस सूत्रांनुसार, पीयूषने गर्लफ्रेंडला भेटण्यापूर्वीच मेडिकल स्टोअरमधून सेक्स पॉवर वाढवणाऱ्या गोळ्या घेतल्या होत्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पॉवरच्या गोळ्या खाऊन राक्षस बनला
गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर मृतदेहावर बलात्कार
पोलीस तपासात मोठे खुलासे
Indore Crime News : इंदूरमध्ये गर्लफ्रेंडची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पीयूष धामनोदिया याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सेक्स पॉवर वाढवणाऱ्या गोळ्या खाऊन मुलीच्या जिवंतपणी आणि हत्येनंतरही अनेक तास तिच्यावर अत्याचार केले, अशी कबुली आरोपीने चौकशीदरम्यान दिली आहे. आरोपीची ही क्रूरता ऐकून तपास करणाऱ्या महिला सब-इन्स्पेक्टरलाही अश्रू अनावर झाले. विशेष म्हणजे, पीयूषच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा कोणताही भाव दिसत नाही.
घटनेचा तपशील
पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे की, आरोपी पीयूषने 10 फेब्रुवारी रोजी द्वारकापुरी येथील अंकल गल्लीतील आपल्या खोलीवर गर्लफ्रेंडला बोलावले होते. व्हॅलेंटाईन वीकनिमित्त खास गिफ्ट देणार असल्याचे सांगून त्याने तिला तिथे आणले होते. खोलीत आल्यानंतर त्याने तिला आधी मॅगी बनवून दिली आणि त्यानंतर आपल्या कटकारस्थानाला सुरुवात केली. पोलीस सूत्रांनुसार, पीयूषने गर्लफ्रेंडला भेटण्यापूर्वीच मेडिकल स्टोअरमधून सेक्स पॉवर वाढवणाऱ्या गोळ्या घेतल्या होत्या.
एमबीएच्या विद्यार्थिनीला मॅगी खाऊ घातल्यानंतर त्याने सांगितले की, त्याला आता गिफ्ट द्यायचे आहे आणि त्यासाठी तिला डोळ्यांवर पट्टी बांधावी लागेल. गर्लफ्रेंड यासाठी तयार झाल्यावर त्याने बोलण्यात गुंतवून तिचे हात-पाय बांधले. यानंतर त्याने आपला खरा हेतू उघड केला आणि संबंध ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. मुलीने तब्येत ठीक नसल्याचे सांगून नकार दिल्यावर पीयूष संतापला. पोलीस तपासात समोर आले आहे की, आरोपीने जबरदस्तीने संबंध ठेवले आणि युवतीच्या तोंडात कपडा कोंबला. यानंतर तिच्या छातीवर बसून गळा दाबला, ज्यामुळे युवती बेशुद्ध झाली आणि तिचा मृत्यू झाला.










