Maharashtra Weather : राज्यावर उष्णतेचं सावट, 'या' जिल्ह्यांना मोठा अलर्ट
Maharashtra Weather : राज्यात हवामान विभागाने 20 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कोरडं आणि उष्ण राहील अशी अपेक्षा आहे. राज्यातील बहुतांश भागात आकाश मुख्यतः निरभ्र किंवा हलक्या ढगाळ राहील. दुपारच्या वेळी उष्णता जाणवेल. जाणून घेऊयात 20 फेब्रुवारी रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यातील हवामान कोरडं आणि उष्ण
जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात हवामान विभागाने 20 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कोरडं आणि उष्ण हवामान राहील अशी अपेक्षा आहे. राज्यातील बहुतांश भागात आकाश मुख्यतः निरभ्र किंवा हलक्या ढगाळ राहील. दुपारच्या वेळी उष्णता जाणवेल. जाणून घेऊयात 20 फेब्रुवारी रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज.
हे ही वाचा : बँकिंग क्षेत्रातील 23 वर्षांच्या नोकरीनंतर अमृता फडणवीस यांचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची पोस्ट तुफान व्हायरल
राज्यातील हवामान विभागाचा अंदाज
कोकण विभागात हवामान हे उष्ण आणि दमट राहील. आर्द्रता जास्त असल्याने अस्वस्थता जाणवेल अशी शक्यता आहे. या विभागातील रत्नागिरी, तसेच रायगड जिल्ह्यातील अलीबाग परिसरात 31-33 अंश कमाल तापमान अपेक्षित राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे हे शहर महत्त्वाचे शहर मानले जाते. या विभागात सोलापूर, कोल्हापूर भागात 33 अंशापर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विभागात थंडावा कमी झाल्याने उष्णतेत वाढ होईल, तसेच हवमान कोरडे राहून, दुपारी उन्हाचा तडाखा कायम राहील असे अपेक्षित आहे.










