धुळे: लग्न पत्रिकेवर नाव छापण्याच्या कारणावरून वाद... साखरपुड्याच्या भर मंडपात दोन गटात तुफान हाणामारी; तिघांचा मृत्यू

मुंबई तक

धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका कौटुंबिक विवाह निमित्ताने साखरपुडा प्रसंगी कौटंबिक दोन गटात वाद झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्न पत्रिकेवर नाव छापण्याच्या कारणावरून वाद...

point

साखरपुड्याच्या भर मंडपात दोन गटात तुफान हाणामारी

point

घटनेत तिघांचा मृत्यू

धुळे: धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका कौटुंबिक विवाहातून साखरपुडाच्या दिवशी कुटुंबातील दोन गटात वाद झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून यात दोन जण गंभीर जखमी झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे. 

लग्नाच्या पत्रिकेवर नाव छापण्याच्या कारणावरून वाद 

या घटनेत सुरेश गोसावी, देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला असून साई गोसावी यांचा धुळ्यात खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी गुजरात राज्यातील सोनगड येथील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या पत्रिकेवर नाव छापण्याच्या कारणावरून कुटुंबातील दोन्ही गटांत मोठा वाद झाला आणि या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणामुळे साखरपुड्याच्या हॉलमध्ये रक्तरंजित हाणामारी झाल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: डॉक्टरचे महिलेसोबत अनैतिक संबंध... शेवटी, डेन्टिस्ट पत्नीच्या हुशारीमुळे भररस्त्यात पतीचं डर्टी सीक्रेट उघडकीस!

व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे धमक्या दिल्याचा आरोप 

वृत्तानुसार, मृताच्या कुटुंबियांनी व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. तसेच, साखरपुडा समारंभाच्या दिवशी किरकोळ कारणावरून झालेल्या रक्तरंजित थराराने पिंपळनेरसह संपूर्ण धुळे जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सरू केला असून पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp