Govt Job: रेल्वेत पुन्हा 5000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती! कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड...
पश्चिम रेल्वेकडून कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय 5000 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने नुकतंच भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रेल्वेत पुन्हा 5000 हून अधिक पदांसाठी बंपर भरती!
कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड...
Govt Job: रेल्वेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पश्चिम रेल्वेकडून कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय अप्रेन्टिसशिपच्या 5000 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने नुकतंच भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अशातच, 21 फेब्रुवारी रोजी उमेदवारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आहे.
या भरतीअंतर्गत पश्चिम रेल्वेकडून अप्रेन्टिसच्या तब्बल 5349 रिक्त पदांवर भरती केली जाणार असून उमेदवार 21 फेब्रुवारी सकाळी 11 वाजल्यापासून ते 23 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. रेल्वेच्या नियमांनुसार, नियुक्त झालेल्या उमेदवारांना स्टायपेंड दिलं जाणार असून 1 वर्षे ट्रेनिंग कालावधी असणार आहे. या भरतीसाठी 15 वर्षे ते 24 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मेरिटच्या आधारे शॉर्टलिस्टिंग आणि नंतर डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशननंतर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
हे ही वाचा: बहिणीची निर्घृण हत्या अन् नंतर फाशी घेऊन भावाची आत्महत्या... नेमकं कारण काय?
काय आहे पात्रता?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदारांनी 10+2 परीक्षा योजनेअंतर्गत किमान 50 टक्के गुणांसह मॅट्रिक्युलेशन (10वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवारांकडे संबंधित ट्रेड फिटर/ वेल्डर/ टर्नर/ मॅकेनिस्ट/ वायरमन/ पाइप फिटर/ प्लंबर/ स्टेनोग्राफर इत्यादी क्षेत्रात NCVT च्या मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे. या भरतीसाठी इंजीनिअरिंग ग्रॅज्युएट्स आणि डिप्लोमा होल्डर्स अर्ज करण्यासाठी पात्र नसतील. शैक्षणिक आणि टेक्निकल पात्रतेसह अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असणं आवश्यक आहे.
हे ही वाचा: "...भाऊ पळवला", राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शिंदेसेनेची प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?
कसं कराल अप्लाय?
1. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम www.rrc-wr.com या पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. त्यानंतर, ट्रेड, आधार नंबर, गुण/ CGPA, डिव्हीजन/ वर्कशॉप यासह पर्सनल डिटेल्स भरा.
3. आधार नंबर आणि ईमेल आयडीच्या साहाय्याने रजिस्ट्रेशन करा.
4. रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, वेबसाइटवर लॉगिन करा आणि आवश्यक सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
5. माहित भरल्यानंतर, उमेदवारांनी आवश्यक दस्ताऐवज सुद्धा अपलोड करा.
6. आता, पूर्ण अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवागानुसार उमेदवारांनी अर्जाची शुल्क भरा.










