नागपूर : बुलेटवर स्टंटबाजी, महिलेला कट मारला अन् पुढे जाऊन डिव्हायडरवर आदळले, दोघांचा मृत्यू 

योगेश पांडे

Nagpur Accident News : स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांनाही रामदास पेठ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. भरधाव वेगात वाहन चालवणे आणि स्टंटबाजी करण्याची हौस अखेर त्यांच्या जीवावर बेतली. या प्रकरणी बजाज नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

Nagpur Accident News
Nagpur Accident News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर : बुलेटवर स्टंटबाजी, महिलेला कट मारला

point

अन् पुढे जाऊन डिव्हायडरवर आदळले, दोघांचा मृत्यू 

Nagpur Accident News : नागपूरमध्ये बुलेटवर स्टंटबाजी करणे दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव वेगात स्टंट करत असताना बुलेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या खांबाला धडकली आणि या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काचीपुरा परिसरात घडली.

मृत तरुणांची नावे युग विशाल चनकापूरे (वय 19) आणि रुद्र शशिकांत सोमकुंवर (वय 19) अशी असून दोघेही काचीपुरा येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे बुलेटवरून वर्धा मार्गावरील जनता चौक येथून बजाजनगरच्या दिशेने भरधाव वेगात येत होते. स्टंटबाजी करत त्यांनी परिसरात मोठा गोंधळ घातल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : 'मुंबईत राहतो मराठी तर...', रोहित शर्माने सर्वांची मने जिंकली; पाहा व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाला?

सोमवारी उशिरा रात्री त्यांनी दोन वेळा बजाजनगर चौकातून वळसा घेत पुन्हा जनता चौकापर्यंत दोन्ही दिशांनी वेगाने बाईक चालवली. भरधाव वेग आणि बेदरकार स्टंटबाजीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास विष्णूजी की रसोई समोर त्यांच्या बुलेटने एका महिला दुचाकीस्वाराला कट मारला. त्यानंतर त्यांचे संतुलन बिघडले. संतुलन सुटल्यामुळे वेगात असलेली बुलेट रस्त्याच्या कडेला सुरू असलेल्या बांधकामाजवळील सिमेंटच्या खांबावर जाऊन जोरात आदळली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही तरुण बाईकसह खांबावर आदळून गंभीर जखमी झाले. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp