'मुंबईत राहतो मराठी तर...', रोहित शर्माने सर्वांची मने जिंकली; पाहा व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाला?

मुंबई तक

Rohit Sharma on Marathi language : या भेटीदरम्यान रोहित शर्माने सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. विशेष म्हणजे, त्याने मराठी भाषेत संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. त्याच्या सहज आणि आत्मीय बोलण्यामुळे सगळ्यांनाच एक वेगळीच आनंदाची अनुभूती मिळाली. यावेळी रोहित शर्माने "मुंबईमध्ये राहतो मराठी तर येणारच", असं वक्तव्य देखील केलंय. 

ADVERTISEMENT

Rohit Sharma on Marathi language
Rohit Sharma on Marathi language
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'मुंबईत राहतो मराठी तर...', रोहित शर्माने सर्वांची मने जिंकली;

point

पाहा व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाला?

Rohit Sharma on Marathi language : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. त्याच्या फलंदाजी प्रेम करणारे लाखो चाहते तर आहेतच, मात्र तो इतरही काही गोष्टींमुळे चर्चेत असतो. विशेष म्हणजे रोहित शर्माची मैदानावर इतर खेळाडूंसोबत बोलण्याची स्टाईल आणि संघाचं नेतृत्व करण्याची पद्धत देखील चर्चेत असते. दरम्यान, सध्या रोहित एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलाय. त्याने एका व्हिडीओमध्ये मुंबई आणि मराठी भाषेविषयी एक वक्तव्य केलंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात... 

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत आणि प्रथमेश शिवलकर या कलाकारांसह अभिनेत्री भक्ती देसाई व भाग्यश्री मिलिंद यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू Rohit Sharma यांची भेट घेण्याची संधी मिळाली. ही विशेष भेट मुंबई क्रिकेट असोसिएशन चे उपाध्यक्ष अजय देसाई यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा : मुस्लिमांना देण्यात आलेलं 5 टक्के आरक्षण रद्द, शासन निर्णयात नेमकं काय आहे? कधी देण्यात आलेलं आरक्षण?

या भेटीदरम्यान रोहित शर्माने सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. विशेष म्हणजे, त्याने मराठी भाषेत संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. त्याच्या सहज आणि आत्मीय बोलण्यामुळे सगळ्यांनाच एक वेगळीच आनंदाची अनुभूती मिळाली. यावेळी रोहित शर्माने "मुंबईमध्ये राहतो मराठी तर येणारच", असं वक्तव्य देखील केलंय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp