मुस्लिमांना देण्यात आलेलं 5 टक्के आरक्षण रद्द, शासन निर्णयात नेमकं काय आहे? कधी देण्यात आलेलं आरक्षण?

मुंबई तक

Muslim Reservation news : सामान्य प्रशासन विभागाच्या वाचा क्र. १ येथील अध्यादेशाचे दिनांक २३.१२.२०१४ पर्यंत कायद्यात रुपांतर न झाल्याने सदरहू अध्यादेश व्यपगत झाला आहे. त्यानुषंगाने निर्गमित केलेले शासन निर्णय / परिपत्रक आपोआप रद्दबातल ठरतात. त्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने वाचा क्र.६ येथील दि.०२.०३.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये अध्यादेशास अनुसरून निर्गमित केलेला वाचा क्र.४ येथील दि.२४.०७.२०१४ रोजी शासन निर्णय रद्द केला आहे. सबब, उपरोक्त अध्यादेश व्यपगत झाल्याने या विभागाकडून निर्गमित केलेले शासन निर्णय / परिपत्रक रद्दबातल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. उपरोक्त पार्श्वभूमीवर शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

ADVERTISEMENT

Muslim Reservation news
Muslim Reservation news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुस्लिमांना देण्यात आलेलं 5 टक्के आरक्षण रद्द

point

शासन निर्णयात नेमकं काय आहे? कधी देण्यात आलेलं आरक्षण?

Muslim Reservation news : महाराष्ट्र सरकारने शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजाला दिले जाणारे 5 टक्के आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यासंदर्भात सुधारित शासन निर्णय (जीआर) जारी करत या निर्णयाला औपचारिक स्वरूप दिले आहे. या नव्या आदेशानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) प्रवर्गाअंतर्गत मुस्लिम समाजाला मिळणारे लाभ यापुढे लागू राहणार नाहीत.

सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा निर्णय कायदेशीर आणि प्रक्रियात्मक कारणांमुळे घेण्यात आला आहे. वर्ष 2014 मध्ये अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजातील काही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देण्यात आले होते. मात्र त्यानंतर बॉम्बे उच्च न्यायालय यांनी सरकारी नोकऱ्यांमधील या आरक्षणावर अंतरिम स्थगिती दिली होती. तसेच हा अध्यादेश निर्धारित कालावधीत कायद्यात रूपांतरित करता आला नाही. परिणामी तो आपोआप निष्प्रभ ठरला.

SEBC चौकटीअंतर्गत राज्य सरकारने यापूर्वी स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी-ए (SBC-A) हा स्वतंत्र प्रवर्ग तयार केला होता. या प्रवर्गाद्वारे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास मुस्लिम घटकांना सरकारी आणि निमसरकारी सेवांमधील थेट भरती तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रियेदरम्यान 5 टक्के आरक्षण दिले जात होते. मात्र नव्या आदेशानुसार या प्रवर्गातील लाभ तात्काळ थांबवण्यात आले आहेत. तसेच मुस्लिम अर्जदारांना देण्यात येणारी जात प्रमाणपत्रे व वैधता प्रमाणपत्रे जारी करण्याची प्रक्रिया देखील स्थगित करण्यात आली आहे.

मुस्लिम आरक्षणाची ही तरतूद जुलै 2014 मध्ये लागू करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा आणि मुस्लिम या दोन्ही समाजांसाठी आरक्षण जाहीर केले होते. मराठा समाजाला 16 टक्के, तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील एकूण आरक्षणाचा टक्का सुमारे 73 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळात मांडला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp