अहिल्यानगर : पोटच्या मुलानेच आईला संपवलं, चाकू आणि अडकित्त्याच्या सहाय्याने हत्या, दोन तास मृतदेहाजवळच खेळत बसला
Ahilyanagar News : अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात पोटच्या मुलानेच आईचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. बेबी गवारे (वय 60) असे मयत महिलेचे नाव असल्याचे समजते. आईला मारहाण करत भिंतीवर डोके आपटले आणि चाकू व अडकित्त्याच्या सहाय्याने मुलाने आईचा खून केला. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुहास गवारे उर्फ मामा असं आरोपीचं नाव आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अहिल्यानगर : पोटच्या मुलानेच आईला संपवलं,
चाकू आणि अडकित्त्याच्या सहाय्याने हत्या
दोन तास मृतदेहाजवळच खेळत बसला
Ahilyanagar News : अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यावरील नवलेनगर परिसरात पोटच्या मुलानेच आईचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. बेबी गवारे (वय 60) असे मयत महिलेचे नाव असल्याचे समजते. आईला मारहाण करत भिंतीवर डोके आपटले आणि चाकू व अडकित्त्याच्या सहाय्याने मुलाने आईचा खून केला. धक्कादायक म्हणजे दोन तास आईच्या मृतदेहाजवळच तो खेळत बसला होता. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुहास गवारे उर्फ मामा असं आरोपीचं नाव आहे.
हे ही वाचा : असं काय झालं की, कुणाल कामरा थेट सुषमा अंधारेंसोबत विधानभवनात पोहोचला... टीशर्टने वेधलं लक्ष!
'या' कारणामुळे केली हत्या
अहिल्यानगरमध्ये पोटच्या मुलानेच आपल्या आईची हत्या केली आहे. संशयित सुहास गवारे उर्फ मामा याने घरगुती किरकोळ कारणातून आईला मारहाण करत भिंतीवर आपटले व चाकू व अडकित्ताच्या सहाय्याने आईचा खून केल्याचे प्राथमिक माहितीवरून पुढे आले आहे. घटनेनंतर त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपाधीक्षक दिलीप टिपरसे, पोलिस निरीक्षक जगदीश बांबळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयित असलेला मुलगा सुहास याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.










