असं काय झालं की, कुणाल कामरा थेट सुषमा अंधारेंसोबत विधानभवनात पोहोचला... टीशर्टने वेधलं लक्ष!

मुंबई तक

Kunal Kamra reached Vidhan Bhavan directly with Sushma Andhare : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त विधानांनंतर कामरा यांच्याविरोधात हक्क भंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार विधानभवन समितीने त्यांना नोटीस बजावली असून, त्यासंदर्भात आज ते हजर झाले.

ADVERTISEMENT

Kunal Kamra reached Vidhan Bhavan directly with Sushma Andhare
Kunal Kamra reached Vidhan Bhavan directly with Sushma Andhare
google news

बातम्या हायलाइट

point

असं काय झालं की,

point

कुणाल कामरा थेट सुषमा अंधारेंसोबत विधानभवनात पोहोचला..

point

टीशर्टने वेधलं लक्ष!

Kunal Kamra reached Vidhan Bhavan directly with Sushma Andhare : स्टँड-अप कॉमेडियन Kunal Kamra आज (दि.17) थेट महाराष्ट्र विधानभवन येथे दाखल झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि आमदार अनिल परब हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील वादग्रस्त विधानांनंतर कामरा यांच्याविरोधात हक्क भंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार विधानभवन समितीने त्यांना नोटीस बजावली होती, त्यासंदर्भात आज ते हजर झाले होते. दरम्यान, बाहेर पडल्यानंतर ते माध्यमांशी काय म्हणाले? जाणून घेऊयात.. 

नेमकं प्रकरण काय? 

कुणाल कामरा यांनी शिवसेना पक्ष फुटीच्या मुद्द्यावर एक विडंबनात्मक गाणे सादर केले होते. या गाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वैयक्तिक आणि कथित अपमानास्पद उल्लेख केल्याचा आरोप आहे. विधानपरिषदेतील भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी कामरा तसेच सुषमा अंधारे यांच्याविरोधात यांच्याविरोधात हक्क भंगाचा प्रस्ताव माडंला होता. “कामरा यांनी सादर केलेल्या गाण्यात उपमुख्यमंत्र्यांचा अवमान करण्यात आला. अंधारे यांनी त्या कार्यक्रमाला पाठिंबा देत आक्षेपार्ह भाषा वापरली, हे सभागृहाचा अवमान आहे,” असा आरोप दरेकर यांनी केला होता.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या? 

सुषमा अंधारे म्हणाल्या, कुणाल कामरा यांनी जी कविता गायली होती, ती कविता The Habitat या स्टु़डिओमध्ये गायली होती. त्यानंतर Habitat या स्टु़डिओची तोडफोड झाली. आता आम्ही त्यांना आरोप काय आहेत? याबाबत विचारणा करत होतो. मात्र, आज जी साक्ष नोंदवण्यात येणार होती, ती नोंदवली गेली नाही. कारण मूळ तक्रारदारांची साक्ष अगोदर नोंदवली गेली पाहिजे. मूळ तक्रारदार हे प्रवीण दरेकर आहेत. मात्र, ते एका वेगळ्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ती साक्ष नोंदवली गेली नाही.

हे वाचलं का?