इस्त्राईलच्या महिलेवर कर्नाटकात बलात्कार, मित्राला कालव्यात बुडवून मारलं, हॉटेल मालकीणीसोबतही दुष्कृत्य, आता न्यायालयाचा मोठा निर्णय
Hampi Gangrape and Murder Case : कर्नाटकातील हंपी हे जागतिक वारसा स्थळ. देशातील आणि जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी भेट देतात. मात्र देशाच्या या वारशाला गालबोट लावणारी एक घटना गेल्या वर्षी घडली होती. 6 मार्च 2025 रोजी इस्त्राईलहून आलेल्या एका महिला पर्यटकावर आणि तिच्यासोबत असलेल्या एका भारतीय महिलेवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. तसेच या महिलांसोबत आलेल्या एका तरुणाची हत्या केली. या घटनेने सबंध देश हादरुन गेला होता. मात्र न्यायालयाने 11 महिन्यांतच यामधील दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इस्त्राईलच्या महिलेवर कर्नाटकात बलात्कार, मित्राला कालव्यात बुडवून मारलं
हॉटेल मालकीणीसोबतही दृष्कृत्य, आता न्यायालयाचा मोठा निर्णय
Hampi Gangrape and Murder Case : कर्नाटकातील हंपी हे जागतिक वारसा स्थळ. देशातील आणि जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी भेट देतात. मात्र देशाच्या या वारशाला गालबोट लावणारी एक घटना गेल्या वर्षी घडली होती. 6 मार्च 2025 रोजी इस्त्राईलहून आलेल्या एका महिला पर्यटकावर आणि तिच्यासोबत असलेल्या एका भारतीय महिलेवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. तसेच या महिलांसोबत आलेल्या एका तरुणाची हत्या केली. या घटनेने सबंध देश हादरुन गेला होता. मात्र न्यायालयाने 11 महिन्यांतच यामधील दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश सदानंद नागप्पा नायक यांनी या घटनेला 'दुर्मिळातील दुर्मिळ' मानत मल्लेश ऊर्फ हांडी मल्लेश, चैतन्य साई आणि शरणप्पा या तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे, अवघ्या 11 महिन्यांत ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाने भारतीय न्यायव्यवस्थेत न्यायाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.
हे ही वाचा : नागपूर : घरच्यांनी पोलीस भरतीच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवलं, पण 11 वीची मुलगी प्रियकरासोबत बिहारला पळाली
काय घडलं होतं?
ही हृदयद्रावक घटना 6 मार्च 2025 च्या रात्री घडली होती. इस्रायली तरुणी, अमेरिकेचा डॅनियल, नाशिकचा पंकज आणि ओडिशाचा बिबास हे पर्यटक हम्पी फिरण्यासाठी आले होते. रात्रीच्या वेळी तुंगभद्रा कालव्यालगत असलेल्या रंगपुरा गंगम्मा मंदिराजवळ हे सर्वजण एका छोट्या संगीत कार्यक्रमाचा आनंद घेत होते. त्यावेळी तिथे पोहोचलेल्या तिन्ही नराधमांनी सुरुवातीला पेट्रोलसाठी 100 रुपयांची मागणी केली. पर्यटकांनी पैसे देण्यास नकार देताच आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि यानंतर माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.
नराधमांनी गाठला क्रूरतेचा कळस
आरोपींनी पंकज, डॅनियल आणि बिबास यांना बेदम मारहाण करुन तुंगभद्रा नदीच्या वेगवान प्रवाहाने वाहणाऱ्या कालव्यात ढकलून दिले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या परदेशी तरुणीवर आणि एका स्थानिक महिला हॉटेल व्यावसायिकावर आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. कालव्यात फेकलेल्यांपैकी पंकज आणि डॅनियल पोहून बाहेर येण्यात यशस्वी झाले, मात्र ओडिशाचा बिबास पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला, ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या नराधमांनी पर्यटकांचे सामानही लुटले होते.










