नागपूर : घरच्यांनी पोलीस भरतीच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवलं, पण 11 वीची मुलगी प्रियकरासोबत बिहारला पळाली
Nagpur Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी मूळची यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून अकरावीत शिक्षण घेत आहे. तिच्या आई-वडिलांनी पोलीस भरतीची तयारी व्हावी म्हणून तिला नागपूरमधील नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पोलीस प्रशिक्षण अकॅडमीत दाखल केले होते. प्रशिक्षणादरम्यान तिची इंस्टाग्रामवरून बिहारमध्ये राहणाऱ्या अकरावी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नागपूर : घरच्यांनी पोलीस भरतीच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवलं
पण 11 वीची मुलगी प्रियकरासोबत बिहारला पळाली
Nagpur Crime News : नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी पाठवलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने सोशल मीडियावर ओळख झालेल्या प्रियकरासोबत थेट बिहार गाठल्याचा प्रकार उघड झाला आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (AHTU) तातडीने कारवाई करत मुलीचा शोध घेऊन तिला सुखरूप परत आणले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी मूळची यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून अकरावीत शिक्षण घेत आहे. तिच्या आई-वडिलांनी पोलीस भरतीची तयारी व्हावी म्हणून तिला नागपूरमधील नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पोलीस प्रशिक्षण अकॅडमीत दाखल केले होते. प्रशिक्षणादरम्यान तिची इंस्टाग्रामवरून बिहारमध्ये राहणाऱ्या अकरावी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले.
मागील आठ ते नऊ महिन्यांपासून दोघांमध्ये सतत चॅटिंग सुरू होते. दरम्यान, संबंधित मुलाने तिला बिहारला येण्यास सांगितले. मात्र प्रवासासाठी पैसे नसल्याने मुलीने आई-वडिलांकडे अकॅडमीची फी भरायची असल्याचे कारण सांगून सात हजार रुपयांची मागणी केली. पालकांनी विश्वास ठेवून पैसे पाठवले; मात्र तिने ते अकॅडमीत जमा न करता थेट प्रयागराज येथे प्रस्थान केले.










