पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक प्रेमसंबंध, नवऱ्याने समजवलं पण तिनं ऐकलं नाही, अखेर विष पिऊन संपवलं जीवन
Crime News : शहीद उधम सिंह नगर भागात एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केली. मृताचे नाव हर्षद सिंह असे आहे. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळावर एक सुसाईड नोट आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीचे परपुरुषाशी अवैध प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, याच त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायकोच्या अवैध प्रेमप्रकरणामुळे नवऱ्याने आत्महत्या केल्याचा संशय
नवऱ्याने अनेकदा समजावलं पण तिनं ऐकलं नाही
Crime News : पंजाबच्या अमृतसरमधील शहीद उधम सिंह नगर भागात एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केली. मृताचे नाव हर्षद सिंह असे आहे. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळावर एक सुसाईड नोट आढळून आल्याची माहिती समोर आल. पत्नीचे परपुरुषाशी अवैध प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, याच त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली. अशातच पोलिसांनी मृताची पत्नी मंजीत कौर उर्फ राणी आणि मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत. आरोपींनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आणि नंतर नातेवाईकांकडे सोपवला.
हे ही वाचा : सोलापूर हादरलं! वाहनाने दुचाकीला चिरडलं, तिघांचा जागीच करुण अंत
बायकोच्या अवैध प्रेमप्रकरणामुळे नवऱ्याने आत्महत्या केल्याचा संशय
मृत्य व्यक्तीचा भाऊ हरमीत सिंहने आरोप केला की, त्याचा भाऊ हर्षदीप सिंगला त्याची पत्नी मनजीत कौर उर्फ राणी आणि मेहुणा गौरव यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. पोलीस निरीक्षक बलजिंदर सिंग यांनी सांगितलं की, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यासाठी छापे टाकण्यात आले.
नवऱ्याने अनेकदा समजावलं पण तिनं ऐकलं नाही
तक्रारीदाराने सांगितलं की, भाऊ हर्षदीप सिंग एका वसुली एजन्सीमध्ये काम करायचा. काही वर्षांपूर्वी त्याने मनजीत कौरशी विवाह केला होता. विवाहानंतर मनजीत कौर आणि तिचा भाऊ गौरव यांच्या घरात काही क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या प्रकरणात हर्षदीपला संशय होता की, आपल्या पत्नीचे परपुरुषाशी अवैध प्रेमसंबंध आहे. हर्षदीपने त्याला अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला, तसेच असं काहीही नको करू असं सांगितलं, पण तिने काहीही एक ऐकलं नाही.
हे ही वाचा : अडीच वर्षांच्या लेकीसोबत वडिलांचे अश्लील चाळे, आईने व्हिडिओ रेकॉर्ड केला... पुढे काय घडलं?










